आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manikarao Comment On Jayant Patil Come From Fastration Bhaskar Jadhav

जयंत पाटील यांच्याबद्दल माणिकरावांचे वक्तव्य नैराश्‍यातून आले - भास्कर जाधव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य पराभवाच्या नैराश्यातून आले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली.


आपल्याला काँग्रेसमध्ये घ्यावे, यासाठी पाटील सोनिया गांधी यांना गळ घालत असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे यांनी बुधवारी सांगलीत केला होता. त्यांचे वक्तव्य जबाबदार प्रदेशाध्यक्ष पदाला शोभणारे नाही, असा टोलाही जाधव यांनी लगावला. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र नसून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी चांगली कामगिरी करत आहे. काँग्रेससह बाकीच्यांनी एकमेकांशी छुपी आघाडी केली आहे, परंतु तरीही आपला पराभव होईल असे काँग्रेसला वाटत असावे. त्या नैराश्यापोटीच ठाकरे यांनी पाटील यांच्याविषयी असे वक्तव्य केले असावे, एवढाच अर्थ यातून निघतो, अशी टीका जाधव यांनी केली. ‘मी उपरा आहे. मग सोनिया गांधींचे गाव कोणते,’ असा सवाल जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत केला होता. त्यावर वाद उफळला आहे.