आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपसभापतिपदासाठी माणिकराव ठाकरे, भाई गिरकर यांच्यात लढत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शुक्रवारी निवडणूक होत अाहे. यात काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि भाजपचे भाई गिरकर यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला असला तरी गिरकर यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत संशय व्यक्त केला जात अाहे.गुरुवारी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत माणिकराव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे २६, काँग्रेसचे १९, भाजपाचे १६, शिवसेनेचे आठ, लोकभारती, शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रत्येकी एक आणि सहा अपक्ष सदस्य आहेत. विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सदस्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा सोडण्याच्या मोबदल्यात काँग्रेसला उपसभापतीपद द्यायचे, असा अाघाडीत समझाेता झाला हाेता. त्यामुळे राष्ट्रवादीने या निवडणुकीत आपला उमेदवार दिलेला नाही. ही भूमिका कायम राहिल्यास ठाकरेंचा विजय निश्चित मानला जाताे. अशा स्थितीत ऐनवेळी भाजपाचे गिरकर उमेदवारी मागे घेऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...