आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानसभा निवडणुकीसाठी आमच्याकडे सक्षम नेतृत्व, पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रत्युत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाच्या मुद्यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ‘राज्याच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व करणारे सक्षम नेतृत्व आमच्याकडे आहे,’ अशा शब्दांत काँग्रेसने मित्रपक्ष राष्ट्रवादीला सुनावले आहे. एवढेच नव्हे तर 2009 च्या फॉर्म्युल्यानुसार जागावाटपाबाबतचा आमचा प्रस्ताव 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी का मान्य नाही केला?’ असा उलट प्रश्नही काँग्रेसने विचारला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी आपण नेतृत्व करावे, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच जाहीररीत्या सांगितले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना ‘काँग्रेस पक्षाकडे अनेक सक्षम नेते आहेत,’ अशा शब्दांत कॉँग्रेस नेत्यांनी पवारांना चोख प्रत्युत्तर दिले. हा प्रस्ताव खरोखरच देण्यात आला काय, असे विचारता याबद्दल पक्षश्रेष्ठीच सांगू शकतील, असे म्हणून त्यांनी याबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला.
सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेताच 2009 च्या जागावाटपाच्या वेळेस जे सूत्र राबवण्याचा आग्रह काँग्रेसने केला होता तेच सूत्र या वेळेस राबवण्याची भूमिका मांडली. मात्र काँग्रेसने अप्रत्यक्षपणे त्याला विरोध करीत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटप करताना हा फॉर्म्युला का वापरला नाही, असा प्रश्न कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विचारला आहे.
रेल्वे आंदोलन सुरूच राहणार
रेल्वे भाडेवाढ अंशत: मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे फसवणूक आहे. ही भाडेवाढ रद्द होईपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील. बुधवारी राज्यभर केलेले रेल रोको आंदोलन यशस्वी झाले, 50 ते 55 ठिकाणी रेल्वे थांबवण्यात आल्या, अशी माहितीही ठाकरेंनी दिली.