आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manikrao Thakare Write The Letter To Petrolium Minister For Stop The Doubt About Diseal Subsidy

डिझेल अनुदानाबाबतचा संभ्रम दूर करण्‍यासाठी माणिकराव ठाकरेंचे पेट्रोलियममंत्र्याना पत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील मच्छीमारांना मासेमारीसाठी अनुदानित दराने डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी लागू केलेल्या दरामुळे मच्छीमारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करावा, अशी विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांना पत्राद्वारे केली आहे.

विविध मच्छीमार संघटनांनी मासेमारीसाठी पूर्वीप्रमाणेच अनुदानित दराने डिझेल देण्याची मागणी केली होती. या मागणीसंदर्भात मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या शिष्टमंडळाने 30 जानेवारी रोजी दिल्ली येथे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांची भेट घेतली होती. मच्छीमारांशी चर्चा केल्यानंतर राहुल गांधी आणि विरप्पा मोईली यांनी दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे मच्छीमारांना अनुदानित दराने डिझेल देण्याचा आदेश तत्काळ जारी केला होता. परंतु, या आदेशाबाबत पेट्रोलियम कंपन्यांच्या नकारात्मक प्रतिसादामुळे मच्छीमारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाकरे यांनी मोईली यांना पत्र पाठवले.