आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीला राज्यात 35 जागा मिळतील - माणिकराव ठाकरें

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 34-35 जागा मिळतील. विदर्भातील 10 पैकी 8 जागा आघाडीला मिळतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शनिवारी सायंकाळी नवा मोंढा येथील पक्षाच्या प्रचार कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, या निवडणुकीत विरोधकांनीही काहीही हवा निर्माण केली तरी त्याचा परिणाम होणार नाही. काँग्रेस आघाडीला राज्यात पोषक वातावरण आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या 14-15 तारखेला राज्यात चार प्रचार सभा घेणार आहेत. 14 रोजी दुपारी 1 वाजता लातूर येथे, तर दुपारी 3 वाजता शिर्डी येथे त्यांची सभा होईल. 15 रोजी दुपारी 1 वाजता पुणे येथे, तर दुपारी 2.30 वाजता हिंगोली येथे प्रचार सभा होईल. 17 तारखेला जालना येथे राहुल गांधी यांची सभा होण्याची शक्यता आहे. 20 तारखेला पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची नंदुरबार व मुंबई येथे प्रचार सभा होण्याची शक्यता आहे. या सभांबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात 2009 मध्ये आघाडीने सर्व विधानसभेच्या जागा जिंकल्या. आता ते स्वत: रिंगणात आहेत. त्यामुळे दोन-अडीच लाखांच्या मताधिक्क्याने ते विजयी होतील, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

बोर्डीकरांना नोटीस
आघाडीचे काम करीत नसल्याबद्दल परभणी जिल्ह्यातील आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोन दिवसांत त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. अशीच कारवाई राणेंचा प्रचार करीत नसल्याबद्दल कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या आमदारावर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.