आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manipur Governor Syed Ahmed Laid To Rest With State Honours

मणिपूरचे राज्‍यपाल डॉ. सैयद अ‍हमद सुपुर्द-ए-खाक, मुंबईत अंत्‍यसंस्‍कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मणिपूरचे वर्तमान राज्‍यपाल डॉ. सैयद अ‍हमद (73) यांचे रविवारी सकाळी कर्करोगाने निधन झाले. त्‍यांना आज (सोमवार) दक्षिण मुंबईच्‍या भायखळा परिसरातील रहमताबाद स्‍मशनाभूमिक शासकीय इतमामात दफन करण्‍यात आले.
डॉ. सैय्यद यांनी महाराष्‍ट्राचे राज्‍यमंत्री म्‍हणूनही काम पाहिलेले होते. मागील एका आठवड्यापासून ते कलावती रुग्‍णालयात भरती होते. त्‍यांच्‍या मागे पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली आहेत. याच वर्षी त्‍यांनी 16 मे रोजी मणिपूरचे राज्‍यपाल म्‍हणून शपथ घेतली होती. यापूर्वी त्‍यांना सुपआ सरकारने 26 ऑगस्‍ट 2011 ला झारखंडचे राज्‍यपाल म्‍हणून नियुक्‍त केले होते. महाराष्‍ट्राचे राज्यपाल सी.व्‍ही.राव यांनी सोमवार सकाळी नागपाडा पोहोचून सैय्यद यांना श्रद्धांजली अर्पण केली. शिवाय त्‍यांचे अंत्‍यदर्शन घेतले.

असा आहे जीवनपट
सैयद हे राजकारणाशिवाय साहित्‍य क्षेत्रातही प्रसिद्ध होते. कसलेलेउर्दू साहित्यिक म्‍हणून त्‍यांची ख्‍याती आहे. उर्दू आणि इंग्रजी या दोन भाषेत एमए केल्‍यानंतर त्‍यांनी उर्दू साहित्‍यात पीएचडी केली. ‘पगडंडी से शहर तक’ या त्‍यांच्‍या आत्‍मकथेला साहित्‍य क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्‍कार मिळालेले आहेत. या शिवाय ‘जंग-ए-आजादी में उर्दू शायरी’, ‘ मकताल से मंजिल’ याही त्‍यांच्‍या साहित्‍यकृती विशेष गाजल्‍या. 1977 मध्‍ये काँग्रेसमधून त्‍यांनी आपल्‍या राजकीय जीवनाला सुरुवात केली. नागपाडा विधानसभा मतदार संघातून ते पाच वेळा काँग्रेसच्या तिकाटावरून निवडून आलेत. दरम्‍यान, त्‍यांना राज्‍यमंत्रीही केले गेले होते.

मुख्‍यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कॉंग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते गुलाम नबी आजाद यांच्‍यासह महाराष्‍ट्रातील अनेक ज्‍येष्‍ठ नेते आणि मणिपूरचे मंत्री, नेते यांनी अंत्‍ययात्रेला भाग घेतला. शिवाय सैय्यद यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सोनिया गांधींनी व्‍यक्‍त केला शोक
डॉ. सैय्यद यांच्‍या निधनाने राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्‍यामुळे कधीही भरून न निघारी पोकळी निर्माण झाली आहे, असा शब्‍दांत अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्‍या अध्‍यक्ष सोनिया गांधी यांनी शोक व्‍यक्‍त केला.