आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोहर जोशी सर सांगणार ‘धंदा कसा करावा’!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री, लाेकसभा अध्यक्ष यासारखी महत्त्वाची पदे भूषवलेले सध्या पक्षातून ‘साइडलाइन’ झालेले ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी अलीकडेच ‘धंदा कसा करावा’ या शीर्षकाचे पुस्तक लिहिले अाहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २५ जून रोजी या पुस्तकाचे प्रकाशन हाेणार अाहे. उद्याेगधंद्यात येण्यासाठी मराठी तरुणांना प्राेत्साहन महत्त्वाच्या टिप्स देणाऱ्या या पुस्तकाला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रस्तावना लाभली आहे. जोशी केवळ हे पुस्तक लिहूनच थांबणार नाहीत, तर उद्योगविश्वात आणखी यशस्वी मराठी ‘कोहिनूर’ घडवण्यासाठी ते प्रशिक्षण वर्गही घेणार आहेत. जाेशींच्या या पुस्तकात १० यशस्वी मराठी उद्योजकांच्या मुलाखती असतील.

‘मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मराठी उद्योगपतींची संख्या अमराठींच्या तुलनेत फारच कमी आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे राज्यात ९० टक्के अमराठी उद्योगपती आहेत, तर मराठी उद्योगपतींची संख्या फक्त १० टक्के आहे. मराठी माणूस उद्योग करण्यापेक्षा राजकारणात जातो, परंतु तिथेही ही संख्या मोठी नाही. अमराठी माणसाने अापल्या राज्यात येऊन कोट्यवधी कमवले, असे मराठी तरुण म्हणतो. मग त्यानेही प्रयत्न केला तर तोही कोट्यवधी कमवू शकतो हे मला दाखवून द्यायचे आहे. जास्तीत जास्त मराठी माणसाने उद्योगधंद्यामध्ये यावे यासाठी काहीतरी करावे असा विचार माझ्या मनात येत होता. मी स्वत: एक यशस्वी उद्योगपती असून माझा मुलगा हा व्यवसाय आणखी पुढे नेत आहे. मराठी तरुणांनीही असेच करावे. त्यांच्यात उद्योगधंद्याबाबत रुची वाढावी म्हणून पुस्तक लिहिण्याचे मी ठरवले आणि त्यातूनच ‘धंदा कसा करावा’ या पुस्तकाची कल्पना पुढे आली. जाेशींनी यापूर्वी नऊ पुस्तके लिहिली असून हे दहावे पुस्तक लवकरच ते छपाईसाठी जाणार आहे,’ असे ते म्हणाले.

यशाचे गुपित होणार उघड
हमालीकरणारे पुण्याचे बबनराव शेळके ३०० ट्रकचे मालक आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शैक्षणिक संस्थांसह अनेक व्यवसाय यशस्वीपणे उभारले. ठाणे येथे शाखाप्रमुख राहिलेला विजय ढवळे आज कॅनडात इन्शुरन्स एजंट अाहे. त्याची वार्षिक उलाढाल १७५ कोटी आहे ज्वेलर्स पराग गाडगीळ, हावरे बिल्डर्स हे यशाचे गुपित उलगडून सांगतील.

केवळ पैसा नकाे, कल्पनशक्ती हवी
‘उद्योगधंदासुरू केला तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. क्लासेस घेत मी सुरुवात केली. उद्योगांसाठी केवळ पैशाचीच आवश्यकता असते असे नाही, तर कल्पनाशक्तीही हवी. हेच सांगणाऱ्या दहा मराठी उद्योगपतींच्या मुलाखती या पुस्तकात दिल्या अाहेत. हे पुस्तक वाचून एक तरुण जरी उद्योग करण्यास प्रवृत्त झाला तरी मी यात यशस्वी झालो असे मला वाटेल’, अशी भावना जाेशींनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...