आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manohar Joshi Criticizes Leadership Of Udhao Thackeray

जोशीसरांच्‍या वक्तव्‍यावरुन शिवसेनेत वादळ, राज ठाकरेंचे मौन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनेचे ज्‍येष्‍ठ नेते आणि माजी मुख्‍यमंत्री मनोहर जोशी यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्‍या नेतृत्त्वावर प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केले आहे. उद्धव ठाकरेंचे नेतृत्त्व मवाळ असल्‍याचा टोला लगावतानाच जोशीसरांनी राज आणि उद्धव बंधुंनी एकत्र येणे आवश्‍यक असल्‍याचेही मत ठामपणे मांडले. दादर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळच्या कार्यक्रमात मनोहर जोशी यांची प्रकट गुलाखत घेण्‍यात आली. त्‍यावेळी त्‍यांनी मांडलेल्‍या भूमिकेवरुन अनेकांच्‍या भुवया उंचावल्‍या. तसेच राजकीय वर्तुळतही अनेक तर्कवितर्क लढविण्‍यास सुरुवात झाली आहे. दरम्‍यान, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी मनोहर जोशी शिवसेना सोडतील, असे वाटत नसल्‍याचे मत व्‍यक्त केले आहे. ते रोहा येथे एका कार्यक्रमाच्‍यावेळी बोलत होते.

दुसरीकडे जोशीसरांच्‍या वक्तव्‍यानंतर शिवसेनेच्‍या नेत्‍यांनी नाराजी व्‍यक्त केली आहे. तर, स्‍वतः मनोहर जोशींना आज 'मातोश्री'वरुन बोलावणे आले. मातोश्रीवर मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे यांच्‍यात बराच वेळ चर्चा झाली. त्‍यानंतर सर्वकाही आलबेल असल्‍याचे जोशींनी सांगितले.

मनोहर जोशींच्‍या वक्तव्‍यावर शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि एकनाथ शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रीया दिली आहे. जोशींच्‍या वक्तव्‍यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून ते पक्षाला ब्‍लॅकमेल करीत असल्‍याचे कदम म्‍हणाले. शिंदे यांनीही जोशींचे वक्तव्‍य निषेधार्ह असल्‍याचे म्‍हटले आहे. खासदार संजय राऊत यांनीही अशी टीका योग्‍य नसल्‍याची प्रतिक्रीया दिली. बाळासाहेबांची नेतृत्त्व करण्‍याची पद्धत वेगळी होती. ते बाळासाहेब होते. उद्धव यांची पद्धत वेगळी आहे, असे राऊत म्‍हणाले.