आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manohar Joshi Meet Sharad Pawar At Delhi, Sets Off Rumours

शरद पवार- मनोहर जोशी भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला रंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेचे वरिष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची सध्या पक्षात घुसमट होत ते नाराज असल्याची चर्चा असतानाच त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटले आहे. जोशी यांना गुरुवारी सकाळी उद्धव ठाकरे यांनाही न काही सांगता थेट दिल्ली गाठत पवारांची भेट घेतली. दरम्यान, ही भेट मुंबई क्रिकेट असोसिएशनची होणारी निवडणूक आणि राज्यसभा निवडणकीच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सध्या सेनेवर नाराज असलेले जोशी सर नेमके काय करताहेत याची चर्चा जोर धरू लागली आहे.
मनोहर जोशी यांनी शरद पवार यांची काल सायंकाळी पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी तासभर भेट घेऊन चर्चा केली. मात्र, या भेटीमागे अनेक कारणे असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेतही याबाबत खमंग चर्चा आहे. जोशी सर यांनी किमान उद्धव ठाकरे यांना तरी पवारांच्या भेटीची कल्पना द्यायला हवी होती, असे बोलले जात आहे. मात्र, जोशी सर खुद्द उ्दधव यांच्यावरच नाराज असल्याने त्यांना सांगण्याचे टाळल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी जोशी यांचा लोकसभा निवडणूकीतून जवळजवळ पत्ता कापल्यात जमा आहे. दादरसारख्या भागातून लोकसभा लढविण्यासाठी इच्छूक असलेले जोशी यांच्याऐवजी राहुल शेवाळे यांना उद्धव यांनी तयारीचे आदेश दिले आहेत.
आणखी पुढे वाचा पवार- जोशी भेटीचा वृत्तांत... क्लिक करा...