आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातोश्रीवर जोशी सरांची ‘हजेरी’! आजच्या दसरा मेळाव्यात उद्धव भूमिका मांडणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उद्धव यांच्या कचखाऊ धोरणामुळे शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुखांचे स्मारक रखडले असून बाळासाहेब असते तर वडिलांच्या स्मारकाला विरोध करणारे सरकारच त्यांनी पाडले असते, या खळबळजनक वक्तव्यावरून सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शनिवारी घूमजाव केले. दरम्यान, जोशी सरांना शनिवारी ‘मातोश्री’वरून बोलावणे आले. उद्धव ठाकरे यांनी त्यांची तासभर ‘हजेरी’ घेतली. या मुद्द्यावर रामदास कदम, संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांनीही जोशींना घेरले.
शुक्रवारी रात्री दादरमध्ये जोशी यांची प्रकट मुलाखत झाली. दक्षिण मध्य मुंबई या पारंपरिक मतदारसंघासाठी जोशी यांचा सध्या पक्षांतर्गत संघर्ष चालू आहे. जोशी यांनी उद्धव यांच्यावर मुलाखतीत थेट हल्ला चढवला होता. पक्षप्रमुख उद्धव यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केल्यामुळे जोशी यांना ‘मातोश्री’चे बोलावणे आले. उद्धव यांनी त्यांची झाडाझडती घेतल्याचे समजते.

टीका केलेलीच नाही
मी दादरमध्ये जे बोललो. त्याचे छायाचित्रण उपलब्ध आहे. काढून पहा. मी उद्धव यांच्या नेतृत्वावर शंका घेतली नाही, की कोणतीही टीका केली नाही.
मनोहर जोशी, शिवसेना नेते