आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोहर जोशी 24 तासानंतरही \'आऊट ऑफ ऱेंज\', राजकीय निवृत्ती घेणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवाजी पार्कवर दस-या मेळाळ्यातील व्यासपीठावरून 'हाय-हाय'च्या घोषणानंतर अपमानजनकरित्या पायऊतार झाल्यानंतर निराश असलेले मनोहर जोशी गेल्या 24 तासांपासून अज्ञातवासात आहेत. सोमवारी सकाळी ते आपल्या पत्नींना सोबत घेऊन मुंबईतून बाहेर पडले होते. तसेच ते आपल्या मूळगावी म्हणजेच रायगड जिल्ह्यातील नांदवी गावी गेल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, जोशी सर तेथेही पोहचले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जोशी सर सध्या पत्नीसोबत लोनावळ्यात विश्रांती घेत असून, विचारमंथन करीत असल्याची माहिती आहे. मात्र, जोशी सरांनी आपला मोबाईल बंद ठेवला असून, कुटुंबियाव्यतिरिक्त कोणाच्याही संपर्कात नाहीत.
शिवसेनेच्या 48 व्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांना नाट्यमयरित्या व अपमानजनकरित्या व्यासपीठावरून पायऊतार व्हावे लागले होते. मैदानात बसलेल्या शिवसैनिकांनी जोशी व्यासपीठावर पोहोचताच मनोहर जोशी हाय-हाय अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर जोशींना व्यासपीठ सोडत हताशपणे आपल्या घरी जावे लागले होते. माध्यमांशी बोलताना त्यांना संयम व सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले होते. तसेच शिवसैनिकांची ही कृती गैरसमजातून झाली आहे, असे म्हणत प्रकरण वाढणार नाही याची दक्षता जोशी घेत होते. मात्र, पक्ष व नेतृत्त्व पातळीवर स्थिती वेगळीच होती. जोशी सरांना मुद्दामपणे डावलण्यात येत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे मनोहर जोशींना शिवसेनेत भविष्यात कोणतेही स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
पुढे वाचा, वयाची पंचाहत्तरी गाठलेले जोशी राजकीय निवृत्ती घेणार.....