आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manohar Joshi Today Meet To Narendra Modi At Ahmadabad

राज्यसभेसाठी फिल्डिंग : सेनेचा ग्रीन सिग्नल मिळताच मनोहर जोशींनी घेतली मोदींची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजीबाबत माफीनामा दिल्यानंतर पक्षातील जेष्ठ नेते मनोहर जोशी पुन्हा एकदा ते 'अॅक्टिव्ह' झाल्याचे दिसून येत आहे. मनोहर जोशी यांनी आज भल्या सकाळी गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची अहमदबाद येथे भेट घेतली. या भेटीचा तपशील मिळाला नसला तरी फेब्रुवारीत राज्यातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुका होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे कळते. सातव्या जागेसाठी शिवसेनेकडे आवश्यक संख्याबळ नाही. त्यामुळे जोशींनी काही संख्याबळाचे गणिते मांडली असून, त्यांनी याबाबत उद्धव यांनाही माहिती दिली आहे. त्यामुळे उद्धव यांनी तुम्हाला तसे वाटत असेल तुम्ही चाचपणी व जुळवाजुळव सुरू करू शकता, असे सांगितल्याचे कळते. तसेच राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी सेनेने जोशींना तुम्ही इच्छुक असाल आणि तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर पाठिंबा देण्याची तयारी दर्शिवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दस-याच्या काळात दिलेल्या भडक मुलाखतीमुळे व त्यानंतर झालेल्या मानापमानाच्या नाट्यानंतर सेनेची नाराजी ओढावून घेतलेल्या जोशींनी सपशेल माघार घेत उद्धव यांच्याकडे माफीनामा दिला होता. त्यानंतर शनिवारी झालेल्या पक्ष बैठकीत जोशींनी मातोश्रीवर हजेरी लावली होती. त्याचवेळी जोशींच्या वादावर दोन्ही बाजूकडून पडदा पडल्याचे दिसून आले होते. त्यानंतर सोमवारी मनोहर जोशींचा वाढदिवस होता. त्यादिवशी जोशींनी उद्धव यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेत सेनेत पुन्हा एकदा नव्या उमीदीने कार्यरत झाल्याचे शिवसैनिकांना दाखवून दिले होते. त्यानंतर पुन्हा राज्यासह दिल्लीतील राजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या जोशी सरांनी राज्यसभेच्या सातव्या जागी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नसले तरी सेनेचा उमेदवार जिंकून येवू शकतो, याबाबत उद्धव यांना माहिती दिली. याबाबत त्यांनी गणिती भाषेत संख्याबळाबाबत आकडेमोड करून दाखविली. त्यानंतर जर तुम्हाला हे असे होईल व घडेल असे वाटत असेल तर तुम्ही तयारी करा, सेना तुम्हाला सातव्या जागेसाठी पाठिंबा देईल, असे उद्धव यांनी जोशींना सांगितल्याचे सूत्रांकडून कळते.
राज्यसभेचे जागेचे जोशींचे काय गणित आहे, वाचा पुढे...