आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manohar Joshi\'s Career Stop, No Position In Shivsena

जोशींना थेट ‘बाहेर जा’ म्‍हणण्‍यापेक्षा उद्धव ठाकरेंनीच घडवून आणले घोषणाबाजी नाट्य?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेचे रोपटे मोठे करणारे मनोहर जोशी यांची कारकीर्द शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात जवळपास संपुष्टातच आल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दसरा मेळाव्यातूनच अपमानास्पदरीत्या काढता पाय घ्यावा लागल्यानंतर आता त्यांना शिवसेनेत स्थान राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच दुसरा कोणताही पक्ष त्यांना योग्य स्थान देईल याबाबतही शंका व्यक्त होत आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या दिवसातच मनोहर जोशी पक्षात अडगळीला पडले होते, त्याचे कारण म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीत दादरमध्ये झालेला पराभव. दरम्यान, शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर पुन्हा पक्षसंघटनेत सक्रिय होत जोशी यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचा विषय काढला. खरे तर स्मारकाबाबत शिवसेनेत कसलीही चर्चा नव्हती वा कोणाच्या डोक्यातही तो विषय नव्हता; परंतु जोशी यांनी स्मारकाचा विषय काढल्याने अन्य नेत्यांनीही पुढे सरसावत आक्रमक प्रतिक्रिया दिल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तंबी दिल्यानंतर अन्य नेते थांबले परंतु मनोहर जोशी काही थांबले नाहीत.

काही दिवसांपूर्वी त्यांनी हा विषय पुन्हा उकरून काढला. ‘शिवसेनाप्रमुख असते आणि प्रबोधनकारांचे स्मारक बनवायचे असते तर त्यांनी सरकार पाडायलाही मागेपुढे पाहिले नसते,’ असे वक्तव्य करीत जोशींनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. हा प्रकार पक्षनेतृत्वाला व सामान्य शिवसैनिकांनाही झोंबला.


इतर पक्षातही स्थान नाही !
मध्यंतरी मनोहर जोशी मनसेत जाणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज नसल्याने आणि हक्काचा मतदारसंघ नसल्याने कोणताही पक्ष त्यांना स्थान देणार नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांना शिवसेनेत राहण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी राजकीय वतरुळात चर्चा आहे. दरम्यान, जोशींचे सलोख्याचे संबंध असणारे राज ठाकरे यांनीही या विषयावर प्रतिक्रियेस नकार दिला.