आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mansoon At Mumbai, Sea Water At Mumbai Resident Area

समुद्राच्या लाटांचे पाणी मुंबईतील रस्त्या-रस्त्यांवर, नागरिकांत कुतूहलासह भीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई शहरात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईच्या पश्चिमेला असणा-या अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अरबी समुद्राच्या मध्यात मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे समुद्र खवळला असून, आज मुंबईतील शिवाजी पार्क, गेट वे ऑफ इंडियासह रस्त्या रस्त्यांवर पाणी घुसले आहे. मुंबईतील विविध भागात समुद्राच्या लाटांचे पाणी आल्याने एकीकडे आश्यर्य व्यक्त केले जात आहे तर दुसरीकडे भीतीही व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांनी मात्र हे सर्व रूटीन असल्याचे म्हटले आहे. आज पौर्णिमा असल्याने सुमद्राच्या लाटा उसळतात असे स्पष्टीकरण अभ्यासकांनी दिले आहे.
केरळच्या किनारपट्टीवर मागील आठवड्यात आलेल्या मान्सून वा-यांनी उत्तरेकडे वेगाने आगेकूच केल्याने मुंबई व परिसरातील समुद्र खवळला आहे. बुधवारी या वा-याने कोकणचा किनारा गाठला होता आज तो मुंबईत पोहचला आहे. त्यामुळे मुंबई व परिसरात जोरदार पाऊस पडला. मात्र पावसापेक्षा शिवाजी पार्कसारख्या नागरी भागात पाणी आल्याने नागिरकांची घबराट झाली आहे. दुसरीकडे, पालिका प्रशासनाने किनारपट्टीवर पुरेशी काळजी घेतल्याचे व उपाययोजना तयार ठेवल्याचे म्हटले आहे. आजच्या पावसाने उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे संपूर्ण मुंबईच्या हवेत गारवा निर्माण झाला आहे.

आणखी पुढे वाचा व पावसाची छायाचित्रे पाहा...