आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mansoon Session Tatkare & Khan Target Oppostions

अधिवेशन : जमीन घोटाळ्याप्रकरणी तटकरे तर अन्सारीप्रकरणी फौजिया खान टार्गेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधी पक्षाने गुरुवारी विधानसभेत आणलेल्या प्रस्तावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना जमीन घोटाळा प्रकरणी व राज्यमंत्री फौजिया खान यांना 26/11 हल्ल्यातील आरोपी जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल प्रकरणी लक्ष्य केले.
मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील आरोपी जबी हा फौजिया खान यांच्या आमदार निवासातील खोलीमध्ये राहिल्याचा आरोप करत विधानसभा विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी तटकरे यांच्यावर होत असलेल्या जमीन घोटाळा प्रकरणी एफआयआर नोंद करून गुन्हे अन्वेषण शाखेच्या चौकशीची मागणी केली.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेविषयी खडसे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेमध्ये त्यांनी फौजिया खान यांचा राजीनामा मागितला. याआधीही हे आरोप सभागृहामध्ये झाले होते. तेव्हा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी खुलासा केला होता. पण आता जबीला अटक केल्यानंतर खान यांनी मंत्री पदावर राहणे योग्य आहे का? असे विचारत त्यांनीही खुलासा करण्याची मागणी खडसे यांनी केली.
सिद्दीकी, लैलाचे प्रकरणही गाजले
गेल्या महिन्यामध्ये येरवडा तुरुंगात कातील सिद्धिकी या आरोपीचा खून झाला होता. त्यानंतर तुरुंगाचे प्रमुख अधिकारी प्रकाश पवार यांना निलंबित करण्यात आले. पण त्यांनी सिद्धकीच्या अंडा सेलच्या बाहेर असलेल्या चार गार्डपैकी तिघांना आपल्या घरी कामाला पाठवले होते, असा अहवाल आपल्याला मिळाल्याचा दावा खडसे यांनी केला. विजय पलांडे प्रकरणामध्ये त्याला मदत करणा-या पोलीस अधिकारी शिंदेला काढून का टाकले नाही असा सवाल करत त्याच प्रकरणातील पलांडे याची मैत्रिण सिमरन सूदशी एका वरिष्ठ अधिका-याचे संबंध होते, असा आरोपही त्यांनी केला. तसेच अभिनेत्री लैला खान हिच्याबरोबर 100 हून अधिक राजकीय नेत्यांचे फोटो असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सरकार गप्प का? : फडणवीस- भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यावर जमीन घोटाळाप्रकरणी झालेल्या आरोपांचा तपास होत नसल्याबद्दल तक्रार केली. तटकरेंवरील आरोपांची दखल राज्य सरकारने न घेतल्यानेच लोक न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाने काही निकाल त्यावर दिला तर आपण म्हणतो न्यायालये हस्तक्षेप करतात. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. तटकरे यांचे पुत्र अनिकेत यांनी बोगस कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचे उद्योग करत असल्याचा आरोप केला. विदर्भातील भंडारा जिल्ह्यामध्येही आता नक्षलवाद पसरत असल्याचा आयबीचा अहवाल असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नक्षलग्रस्त भागातील लोकप्रतिनिधीही राजीनामे देत असताना सरकार मात्र गप्प बसून असल्याचे ते म्हणाले.
कोठडीत मृत्यू वाढले- राज्यामध्ये पोलिस कोठडीमध्ये होणा-या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. 2001 ते 2010 दरम्यान 14,231 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 12 हजार आरोपी फरार झाल्याचे गृह विभागाने मुंबई उच्च् न्यायालयासमोर कबूल केले आहे. त्यामुळेच दिल्ली पोलिसांनी मुंबई बॉम्बस्फोटातील सूत्रधार अतिरेकी जबीचा ताबा मुंबई पोलिसांना देण्यास नकार दिला, असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.
स्त्री भ्रूणहत्या प्रकरण तडीस नेऊ- आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी
कर्नाटक सरकार बरखास्तीची विधिमंडळात आग्रही मागणी
वांद्रे सी लिंकच्या सल्ल्यासाठी सरकारने मोजले 33 कोटी