आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#IndvsPak:भारताच्या विजयासाठी देशभर प्रार्थना व होम हवन, पाहा फोटोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत होम हवन करताना भारतीय संघाचे पाठीराखे... - Divya Marathi
मुंबईत होम हवन करताना भारतीय संघाचे पाठीराखे...
मुंबई- भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज हायहोल्टेज सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोनही देशातील तमाम क्रिकेटप्रेमी हा सामना आपल्याच संघाने जिंकावा यासाठी प्रार्थना करीत आहेत. आज कोलकात्यात होणारा हा सामना भारत आणि पाकिस्तानातील नागरिकांसह जगभरातील कोट्यावधी लोक पाहणार आहेत. भारताने आपला पहिला सामना गमावल्यामुळे टीम इंडियावर दबाव असेल तर पाकिस्तानने पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकल्याने ते कमालीचे निश्चित असतील.
भारतीय संघाने आजचा पाकिस्तानविरोधातील सामना जिंकावा यासाठी भारतातील नागरिकांनी आज सकाळपासून प्रार्थना व होम हवन करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईपासून पासून लखनौ, कोलकाता, दिल्ली, नागपूर, कानपूर शहरांत भारतीय संघासाठी प्रार्थना केली. वाराणसी, पुरी, शाळेतील मुलांनीही भारतीय संघाला जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर देशातील मुस्लिम बांधवांनीही दर्ग्यात जाऊन चादर चढवत भारतीय संघाच्या विजयासाठी मन्नत मागितली.
न्यूझीलंकडून पहिल्याच लढतीमधील धक्कादायक पराभवानंतर आता शनिवारी टीम इंडियाला पाकचा फडशा पाडवाच लागणार आहे. अजिंक्यपदाचे प्रबळ दावेदार असणार्‍या टीम इंडियाला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याबरोबरच आयसीसीच्या स्पर्धेतील पाकविरुद्ध आपली विजयी परंपरा कायम राखण्याचेही आव्हान असेल. नागपूर येथे झालेल्या पहिल्या लढतीत 126 धावांचे टार्गेट असतानाही टीम इंडिया 79 धावांत ढेपाळली होती; तर दुसरीकडे पाकने बांगलादेशविरुद्ध 200 धावा ठोकत दणदणीत विजय साजरा केला होता. इडन गार्डन्सवरच पाक आता दुसरा विजय साजरा करून आगेकूच कायम राखण्याबरोबरच वर्ल्डकपमधील भारताविरुद्ध पराभवाचे रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्नही असेल. पाकविरुद्ध पराभव झाल्यास टीम इंडियाची प्रतिष्ठा तर धुळीस मिळेलच; पण वर्ल्डकपमधील मार्गही कठीण होऊन जाईल. त्यामुळेच भारतीय संघाचे पाठीराखे चिंतेत आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच चाहते भारतीय संघाला विजयासाठी प्रार्थना रूपाने शुभेच्छा देत आहेत.
भारतीय चाहत्यांनी कशा पद्धतीने केले होमहवन व प्रार्थना पाहा छायाचित्रांतून...
बातम्या आणखी आहेत...