आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्रालयात संशयास्पद वस्तूमुळे बॉम्बची अफवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट असताना बुधवारी सायंकाळी मंत्रालय परिसरात बेवारस बॅग व सायकल आढळून आल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली असता या बॅगमध्ये वायरीचे तुकडे व कागदाचे बोळे आढळून आले.

मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळील जनता जनार्दन गेटसमोर एका झाडाखाली सायंकाळी सहाच्या सुमारास निळ्या रंगाची प्लास्टीक बॅग व सायकल बेवारस स्थितीत पडून असल्याचे दिसून आले. संशय आल्यामुळे पोलिसांनी त्वरेने हालचाली करत संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला. नेमक्या त्याचवेळी मुख्यमंत्री मंत्रालयात आले होते. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा, अशी शंका आली. मात्र तपासणीअंती कोणतीही स्फोटक वस्तू सापडली नाही.