आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Many Maharashtra Ministers Eager To Join BJP Devendra Phadnvis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील अनेक मंत्री भाजपमध्ये येण्यास उत्सुक, फडणवीस-तावडे यांचा गौप्यस्फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -‘राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक मंत्री, दिग्गज नेते व काही आमदार आमच्या संपर्कात असून ते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत,’ असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला, त्या वेळी दादरच्या पक्ष कार्यालयात त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. या वेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले असून त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेतही होणार आहे. सत्ताधारी आघाडीला आम्ही आणखी मोठा ‘शॉक’ देणार आहोत. या दोन्ही काँग्रेसमधील काही मंत्री, दिग्गज नेते व आमदारांनी आमच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आहे. त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे. मात्र लोकहिताची कामे करणार्‍या व देशहितासाठी कार्य करणार्‍या लोकांनाच आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे असतील,’असेही फडणवीस यांनी सूचित केले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही फडणवीस यांच्या वक्तव्यास दुजोरा दिला. दोन्ही काँग्रेसचे अनेक नेते, मंत्री, आमदार आमच्या संपर्कात असल्याने त्यापैकी कोणाची निवड करायची याचा आमच्याकडे आता ‘चॉइस’ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.