आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Many Years Pending Nagar Beed Parli Railway Rout Possible

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेचा मार्ग मोकळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या २६१ किलोमीटर अंतराच्या नवीन रेल्वेमार्गाच्या उभारणीचा ५० टक्के खर्च उचलण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या रेल्वेमार्गाच्या निर्मितीसाठी एकूण २८२६ कोटी रुपयांचा खर्च अंदाजित असून त्यापैकी १४१३ कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे.

या प्रकल्पासाठीचा आर्थिक निधी अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देणार आहे. फेब्रुवारी २००९ मध्ये राज्य मंत्रिमंडळाने याबाबत निर्णय घेऊन त्या वेळी १०१० कोटी खर्चाच्या ५० टक्के म्हणजे ५०५ कोटींच्या राज्याच्या आर्थिक वाट्यास मान्यता दिली होती. सध्या या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी या प्रकल्पात लक्ष घातले अाहे. त्यांनी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याशी व्हिडिअाे काॅन्फरन्सिंगद्वारे या प्रकल्पाचा अाढावा घेतला हाेता. माेदींनी राज्याचा खर्च उचलण्यासही सांगितले होते.