आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन्या सुर्वेची भूमिका आव्हानात्मक : जॉन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गुन्हेगारी जगतावर आधारित असलेल्या दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या ‘शूटआऊट अ‍ॅट वडाळा’ या चित्रपटात गँगस्टर मन्या सुर्वे उभा करणे एक मोठे आव्हान होते, असे यात मुख्य भूमिका साकारणा-या अभिनेता जॉन अब्राहमने एका मुलाखतीत सांगितले.

अनेक अ‍ॅक्शन चित्रपटात लीलया भूमिका साकारणा-या जॉन अब्राहमची या चित्रपटातही प्रमुख भूमिका आहे. त्याबद्दल जॉन म्हणाला, मन्याबद्दल फारशी माहिती नसल्याने त्या काळात मुंबईतील गुन्हेगारी जगताचे वृत्तांकन करणा-या पत्रकारांची आम्ही मदत घेतली. मन्या हा सर्वसाधारण महाराष्‍ट्रीय कुटुंबातील मुलगा होता. त्याला इंजिनिअर व्हायचे होते. मात्र, काही कारणामुळे तो गुन्हेगारी जगतात ओढला गेला. मन्याच्या पात्रात अनेक रंग आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला मी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. जॉनशिवाय या चित्रपटात अनिल कपूर, कंगना राणावत, तुषार कपूर आणि सोनू सूद यांच्याही भूमिका आहेत. 1 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मुंबईतील पहिले एन्काउंटर
मन्या सुर्वे हे मुंबई पोलिसांनी केलेले पहिले एन्काउंटर प्रकरण आहे. मन्याबद्दल त्या वेळी अनेकांना काहीही माहिती नव्हती. त्या वेळी मुंबईत त्याची प्रचंड दहशत होती. त्यामुळे ‘शूटआऊट अ‍ॅट वडाळा’ या चित्रपटाची अनेक जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत.