आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा, मुस्लिम आरक्षणाचा निर्णय आज मंत्रिमंडळात?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणार्‍या बैठकीत मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येईल, असे संकेत आहेत. मराठा समाजाला 8 ते 12 टक्के तर मुस्लिमांना 4.5 टक्के आरक्षण देण्याची शिफारस राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने मंत्रिमंडळाकडे केली आहे. आता नेमके किती टक्के आरक्षण दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बुधवारी संध्याकाळी चार वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. आरक्षणाची घोषणा राज्य सरकारने यापुर्वीच विधिमंडळात केली असून विधान परिषद निवडणुकीची आचार संहिता असल्याने हा निर्णय घेता येत नसल्याचे जाहीर केले होते. मात्र मंगळवारी या निवडणुकीची मतमोजणीही आटोपल्याने आता हा निर्णय घेण्यास कोणताही अडसर उरणार नाही. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भास्कर जाधव या आपल्या मराठा समाजातील प्रदेशाध्यक्षास राज्य सरकारमध्ये मंत्रीपदी पाठवले जाणार आहे तर सुनील तटकरे या ओबीसी चेहर्‍यास प्रदेशाध्यक्ष पद दिले जाईल.