आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेर्चेकऱ्यांच्या मदतीसाठी पंधरा हजार स्वयंसेवक; कोंडी टाळण्यासाठी शहराबाहेर उभारले वाहनतळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नऊ अाॅगस्ट राेजी सकाळी ११ वाजता मुंबईत धडकणाऱ्या सकल मराठा क्रांती माेर्चासाठी राज्यभरातून लाखाे कार्यकर्ते मुंबईत धडकले अाहेत. माेर्चासाठी अावश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेण्यात अाल्या असून १५ हजार कार्यकर्ते माेर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करतील. त्याचप्रमाणे मुंबईतील वाहतूक काेंडी टाळण्यासाठी ‘बीपीटी’ येथे वाहनतळ उभारण्यात अाला असल्याची माहिती मराठा क्रांती माेर्चाच्या अायाेजकांनी दिली.    

मुंबईच्या इतिहासात अाजवरचा सर्वात माेठा हा  माेर्चा असेल, असे प्रयत्न अायाेजकांकडून करण्यात अाले अाहेत. तसेच अाजवरच्या सर्व माेर्चांत ज्याप्रमाणे शिस्त पाळण्यात अाली, तीच शिस्त मुंबईच्या मूकमाेर्चातही पाळण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माेर्चाचा मार्ग
सकाळी ११ वाजता माेर्चा भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानापासून सुरू हाेऊन ताे अण्णासाहेब पाटील पूल >खडापारसी>इस्माईल मर्चंट चाैक>जे.जे. फ्लायअाेव्हर>छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस>अाझाद मैदान येथे जाईल.

मुंबईत दाखल हाेणाऱ्या माेर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड  येथील कार्यकर्ते स्वयंसेवकाच्या भूमिकेत असतील.

२५ हजार वाहनांसाठी तळ   
मुंबईच्या वाहतूक काेंडीत भर पडू नये यासाठी मुंबई पाेर्ट ट्रस्ट, सिमेंट यार्ड, रे राेड येथे वाहनतळ उभारण्यात अाले अाहेत. एकाच वेळी २५ हजार वाहने येथे उभी राहू शकतील. वाहनांची संख्या वाढल्यास वडाळा ट्रक टर्मिनलचा पर्यायदेखील उपलब्ध राहणार अाहे. रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी नाशिकहून येणाऱ्या कार्यकर्त्यांनी जवळच्या रेल्वेस्थानकाजवळ गाड्या उभ्या करून कसारामार्गे रेल्वे पकडून भायखळा येथे उतरावे. भायखळा तसेच प्रत्येक स्थानकावर स्वयंसेवक असतील. ते माेर्चा मार्गाने कसे यायचे याचे मार्गदर्शन करतील. पश्चिम महाराष्ट्र, गाेवा, काेकण या भागातून येणाऱ्यांनी पनवेल येथे पाेहोचून लाेकलमध्ये बसून रे राेड स्थानकावर उतरल्यास तेथून चालत माेर्चाचे ठिकाण जवळ अाहे. दहा ते बारा मिनिटांत वीर जिजामाता भाेसले उद्यानात पाेहोचू शकतील.   

माेबाइल  टाॅयलेट
बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांसाठी मुंबई शहराच्या बाहेरच पार्किंगची व्यवस्था करण्यात अाली अाहे. या ठिकाणीच माेबाइल टाॅयलेटची साेयही महापालिकेच्या वतीने करण्यात अाली अाहे. इथेच फ्रेश होऊन, नाष्टा करून कार्यकर्ते लाेकल वाहतुकीचा उपयाेग करून जिथून माेर्चा निघणार अाहे तिथे पाेहाेचू शकतील.

अडचण अाल्यास मिसकाॅल सुविधा  
माेर्चासंदर्भात सर्व माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ९३५०४११०११ हा मिसकाॅल क्रमांक तयार करण्यात अाला अाहे. माेर्चाच्या ठिकाणापर्यंत पाेहोचण्यासाठी काेणतीही अडचण निर्माण झाल्यास या क्रमांकाच्या माध्यमातून मदत हाेऊ शकते.
 
डबेवालेही होणार मोर्चात सहभागी...
मुंबईतील डबेवाल्यांनी मराठा क्रांती मूकमोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. डबेवाल्यांनी उद्या एक दिवस काम बंद ठेऊन मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आम्ही मोर्चात सहभागी होत असल्याचे डबेवाल्यांनी म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...