आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगावातही धडकला मराठा क्रांती माेर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेळगाव - मराठा समाजाला अारक्षण द्यावे, कर्नाटक सरकारकडून हाेणारा मराठा समाजावरील अन्याय दूर करावा या मागणीसाठी गुरुवारी बेळगावात मराठी बांधवांच्या वतीने भव्य माेर्चा काढण्यात अाला. राज्यकर्त्यांनो जागे व्हा, असा इशाराही कानडी सरकारला देण्यात अाला. सुमारे सहा लाखांहून अधिक अांदाेलक या माेर्चात सहभागी झाले हाेते, असा अायाेजकांचा दावा अाहे. 
 
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न साेडवावा, काेपर्डीतील नराधमांना कठाेर शिक्षा करा, अॅट्राॅसिटी कायद्यात सुधारणा करावी अादी मागण्याही या वेळी करण्यात अाल्या. कोल्हापूरच्या महापौर हसीना बाबू फरास,  बेळगावच्या महापौर सरिता पाटील, आमदार अरविंद पाटील, संभाजी पाटील, उपमहापौर संजय शिंदे यांच्यासह सर्वच स्तरातील नागरिकांची उपस्थिती हाेती.  सरकारी परिपत्रके मराठीत द्यावीत, संभाजी महाराज यांची समाधी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी  अादी मागण्याही करण्यात अाल्या. 
बातम्या आणखी आहेत...