आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक मराठा..लाख मराठा छायाचित्रांमधून पाहा राजधानी मुंबईतील मराठ्यांचा एल्गार...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठा आरक्षणासह अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी राज्यभर उठलेले मराठा क्रांती मूकमोर्चाचे 'एक मराठा- लाख मराठा' वादळ देशाची आर्थिक राजधानी मुंबईत धडकले आहे. समाजातील लाखो लोक संपूर्ण महाराष्‍ट्रातून मुंबईत दाखल झाले आहेत. भायखळा येथील जिजामाता उद्यानातून महिलांच्या नेतृत्त्वात मराठा मोर्चा सुरु झाला आहे. जेजे उड्डाण पुलावरुन निघून हा मोर्चा आझाद मैदानावर विसर्जित करण्‍यात येणार आहे. मराठा समाजाच्या वतीने एक शिष्टमंडळ आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करेल.
मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांसाठी आतापर्यंत राज्यभरात 57 मोर्चे निघाले असून मुंबईतील हा 58 वा मोर्चा आहे.

एक मराठा..लाख मराठा! मुंबईतील मराठ्यांचा एल्गार पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...