आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा असे काय आहे या पोस्‍टर्समध्‍ये, ते पाहून लाखो मराठा बांधवांनी आवळली वज्रमूठ!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- समाजातील 50 लोकांना एकत्र आणणे म्‍हणजे शिवधनुष्य हाती घेतल्या सारखे आहे. पण राज्‍यात निघणार्‍या मराठा मूक मोर्चात लाखो मराठे एकजूट दाखवतात, हे विशेष. आतापर्यंत राज्यात 57 मराठा मोर्चा काढण्यात आले. 9 ऑगस्टला मुंबईत विराट मोर्चा निघणार आहे. मुंबईत होणारा हा शेवटचा मूकमोर्चा आहे. पण आंदोलन थांबलेले नाही, असे समन्वय समितीने म्हटले आहे.   
 
घराला कुलूप लावून अबालवृद्ध सहभागी होतात मोर्चात...
शहरा-शहरांमधून निघालेल्या मोर्चातील गर्दीने अनेक विक्रम मोडीत काढले होते. मुंबईत होणार मोर्चा सर्वात मोठा असेल असे आयोजकांनी म्हटले आहे. राज्यातील मराठा लोक घराला कुलूप लावून अबालवृद्धांसह मोर्चात सहभागी होतात. विशेष म्हणजे ते स्‍वखर्चाने या मोर्चात येतात. शिवाय अत्‍यंत शिस्‍तबद्ध पद्धतीने मोर्चा यशस्‍वी होतो, कोणताही अनुचित प्रकार कुठेही दिसून येत नाही. या एकूण नियोजनात सोशल मीडियाची महत्‍त्वाची भूमिका ठरली आहे. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला असे पोस्‍टर्स दाखवणार आहोत की, ज्‍याद्वारे मराठ्यांना मोर्चात सहभागी होण्‍याचे आव्‍हान केले जात आहे.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, सोशल मीडियावर नेमकं काय होतेय व्‍हायरल?
बातम्या आणखी आहेत...