आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत \'एक मराठा, लाख मराठा\'चा एल्गार; मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठा मोर्चाचा समारोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठा आरक्षणासह अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी राज्यभर उठलेले मराठा क्रांती मूकमोर्चाचे 'एक मराठा- लाख मराठा' वादळ देशाची आर्थिक राजधानी मुंबईत धडकले आहे. समाजातील लाखाे लोक राज्याच्या काना-काेपऱ्यातून मुंबईत दाखल झाले आहेत.

एक मराठा..लाख मराठा छायाचित्रांमधून पाहा राजधानी मुंबईतील मराठ्यांचा एल्गार...

भायखळा येथील जिजामाता उद्यानातून महिलांच्या नेतृत्त्वात न‍िघालेल्या मराठा मोर्चाचा स समारोप आझाद मैदानावर झाला. आझाद मैदानावर तरुणींनी भाषणे दिली. दुसरीकडे मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने विधानसभेत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. मात्र, सकारात्मक उत्तर मिळाल्याशिवाय आझाद मैदानावरून हलणार नाही, असा निर्धार मराठा कार्यकर्त्यांनी केला आहे.

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज राहणार नाही. मराठा विद्यार्थ्यांना 6 लाखांच्या ईबीसी मर्यादेसाठी असलेली 60 टक्के गुणांची अट 50 टक्के करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री महत्त्वपूर्ण घोषणा करणार..
मराठा क्रांती मोर्चाला भाजपच्या सर्व मंत्र्यांचा पाठींबा आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असून सरकार देखील सकारात्मक विचार करत आहे. मुख्यमंत्री आज महत्त्वपूर्ण घोषणा करणार आहे.

मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांसाठी आतापर्यंत राज्यभरात 57 माेर्चे निघाले असून मुंबईतील हा 58  वा मोर्चा आहे.

LIVE UPDATES:
>  सकारात्मक उत्तर मिळाल्याशिवाय आझाद मैदानावरून हलणार नाही, मराठा कार्यकर्त्यांचा निर्धार
> मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने विधानसभेत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले.
> तरुणींकडून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, आझाद मैदानावर तरुणींचे निवेदने सुरु
> मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री महत्त्वपूर्ण घोषणा करतील : रावसाहेब दानवे
> मुंबईतील मोर्चा समारोपाचा समजू नये, ही सुरुवात आहे : निलेश राणे
> विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी, सतेज पाटील यांनी अजित पवारांना बांधला फेटा!
> मोर्चात सहभागी होण्यासाठी विरोधक विधानभवनातून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना
> शिवसेनेला डिवचू नका, 50 वर्षे सत्तेत होते तेव्हा मराठ्यांची आठवण आली नाही, गुलाबराव पाटील यांचे जि्तेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर
> शिवसेनेने एक ओळीचा ठराव आणावा, आम्ही एकत्रित ठरावला पाठिंबा देऊ, सत्ताधारी शिवसेनेला जितेंद्र आव्हाड यांचे आव्हान
> मोर्चे कसे असावे, हे मराठा मोर्चाने जगाला दाखवलं : खासदार संभाजीराजे छत्रपती
> मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी विरोधक रवाना
> विधानभवनावरून विरोधक आझाद मैदानाच्या दिशेने रवाना
>
विधानसभेचे कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब
> खासदार छत्रपती संभाजी राजे यांचा मराठा मोर्चात सहभाग
> सभागृहात राजदंड उचलण्याचा विरोधकांचा प्रयत्न
> विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने 
> विधानसभेत चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार
> मराठा आरक्षणासाठी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी
> विधिमंडळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ

> अभिनेता रितेश देशमुखचाही मुंबईतील मराठा मोर्चाला पाठिंबा
> विधानभवनाबाहेर भाजप आमदार आणि मंत्र्यांचा मुंबईतील मराठा मोर्चाला पाठिंबा
> मुंबईतील जेजे फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद, फक्त मोर्चेकऱ्यांना इथून जाण्याची परवानगी
> भाजप नेते आशिष शेलार यांना आझाद मैदानात मराठा कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की, मात्र शेलारांनी वृत्त शेलारांनी फेटाळले
> 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मराठा मोर्चातील मोर्चेकरी क्रांतीची मशाल पेटवून जिजामाता उद्यानाकडे रवाना
> नवी मुंबईतील सर्व पार्किंग ग्राऊंड जवळपास फुल्ल, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या गाड्या पार्क
> तब्बल 20 ते 25 लाख कार्यकर्ते या माेर्चात सहभागी होतील, असा दावा संयाेजकांनी केला अाहे.

दरम्यान, मुंबई महापालिका, पाेलिस व इतर सरकारी यंत्रणा या पार्श्वभूमीवर सज्ज अाहे. मुंबईत दाखल झालेल्या मोर्चेकरांच्या सर्व वाहनांना टोल माफ करण्यात आले आहे.

डिझास्टर मॅनेजमेंट
शिवाजी मंदिर येथे मराठा संघटनांचे डिझास्टर मॅनेजमेंट सेल काम करत आहे. ही टीम मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेत आहे.

डबेवालेही सहभागी
मुं
बईतील चाकरमान्यांच्या जेवणाची वर्षानुवर्षे व्यवस्था करणारे मुंबईचे डबेवाले मराठा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी मोर्चात सहभागी झाले आहेत. यामुळे बुधवारी डबेवाल्यांची सेवा उपलब्ध होणार नाही.

कुलाबा ते सायन वांद्रेतील 500 शाळांना आज सुट्टी...
मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कुलाबा ते सायन वांद्रे परिसरातील 500 शाळांना सुट्टी देण्‍यात आली आहे. वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने शालेय वाहतुकीस या मोर्चामुळे अडचण निर्माण होईल. ही शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

या मोर्चासाठी ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, सोलापूर आणि कोल्हापूरसह राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव एकवटला आहे.  इतर जिल्ह्यांमधून मोर्चासाठी समाजाचे लोक येणार असल्याने मुंबई शहर आणि लगतच्या उपनगरांमधील रेल्वेस्टेशनवर ‘रेल मराठा स्वयंसेवक’ तैनात ठेवण्यात आले होते.  तसेच मराठा मोर्चात सामील होणाऱ्या वाहनांसाठी बीपीटी सिमेंट यार्ड आणि वडाळा ट्रक टर्मिनल येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय मोर्चासाठी येणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 15 हजार स्वयंसेवकाची फौज सज्ज ठेवण्यात आली होती. हे स्वयंसेवक मोर्चात समन्वयकाची भूमिका बजावतानाच मोर्चाचा मार्ग तसेच पार्किंग व्यवस्थेविषयी मार्गदर्शन करतील, अशी माहिती मराठा माेर्चा समन्वयक भय्या पाटील यांनी दिली होती.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना नवी मुंबईतून यावे लागले. अहमदनगरकडून येणाऱ्या वाहनांसाठी मुरबाड येथे महामार्गालगत कल्याणमध्ये बिर्ला कॉलेज मैदानात आणि डोंबिवलीत संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. 

मुंबई महापालिकेची तयारी  
मोर्चाच्या निमित्ताने  मुंबईत  8 आरोग्य कक्ष उभारण्यात आले असून प्रत्येक आरोग्य कक्षात 10 पुरुष व महिला डाॅक्टर्सची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. आझाद मैदानाचे प्रवेशद्वार 40 फुटांपर्यंत मोठे करण्यात आले असून मैदानात पिण्याच्या पाण्याचे टँकर्स तसेच 20 फिरत्या शौचालयांची सोय करण्यात आली आहे. याचबरोबर फायर इंजिन्सची सुविधा देण्यात आली असून आझाद मैदानावर गर्दी झाल्यास समोरील बाॅम्बे जिमखान्याचे मैदानही खुले करण्यात येईल.
 
हे ही वाचा...
> पाहा असे काय आहे या पोस्‍टर्समध्‍ये, ते पाहून लाखो मराठा बांधवांनी आवळली वज्रमूठ!
>मराठा मोर्चातील हे खास चेहरे राहतील तुमच्या कायम लक्षात; पाहा व्हायरल फोटो
>माेर्चेकऱ्यांच्या मदतीसाठी पंधरा हजार स्वयंसेवक; कोंडी टाळण्यासाठी शहराबाहेर उभारले वाहनतळ
>मराठा क्रांती मोर्चा : डॉक्टरर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन अशी सज्ज झालीय मुंबई
>मराठी मोर्चा: मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर अाज जड वाहनांना प्रवेशबंदी
>मराठा मोर्चा: केवळ चर्चा नकाे, मराठा अारक्षण द्या : धनंजय मुंडे
>मराठा क्रांती मोर्चाला पाकिस्तानातूनही पाठिंबा; फेसबूक पेजवर झळकली समर्थनाची पोस्ट
बातम्या आणखी आहेत...