आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाला सुरवात, पावसाचे सावट तरीही लाखो लोक एकवटण्‍याची शक्‍यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी मुंबई- अॅट्रॉसिटी कायद्यामध्‍ये बदल करा, मराठा समाजाला आरक्षण द्या अशा प्रमुख मागण्यांसाठी नवी मुंबईमध्‍येही आज मराठा क्रांती मूक मोर्चा निघाला आहे. नवी मुंबईमध्‍ये खारघर सेंट्रल पार्कमधून मोर्चाला सुरुवात झाली. या मूक मोर्चामध्ये भाजपचे आमदार प्रवीण दरेकर सहभागी झाले आहेत.
- नवी मुंबईमध्‍ये निघणारा मोर्चा हा रायगड आणि नवी मुंबई या दोन विभागांचा आहे.
- पावसाचे सावट असले तरी मोठ्या संख्‍येने मराठा बांधव या मोर्चामध्‍ये सहभागी झाले आहेत.
- दोन विभागातून लाखो मराठा बांधव या मोर्चात जमतील असा अंदाज व्‍यक्‍त होत आहे.
- सेंट्रल पार्क ते कोकण भवन असा हा मोर्चा निघत आहे.
- मोर्चाच्‍या आधी घेण्‍यात आलेल्‍या नियोजन बैठकांनाही भक्‍कम प्रतिसाद लाभला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, नवी मुंबईमधील मोर्चाचे फोटो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...