आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चाची चर्चा सातासमुद्रापार, कॅनडातील ही कार पाहून लोक विचारतात काय आहे मराठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठा समाजाच्‍या मोर्चाची चर्चा देशातच नव्‍हे तर, सातासमुद्रापारही सुरू आहे. नोकरी-शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात असलेल्‍या मराठा युवकांना या मोर्चात सहभागी व्‍हायचे होते. मात्र, प्रत्‍यक्ष येथे येणे शक्‍य नसल्‍याने ते विदेशातून या मोर्चाला प्रात्‍साहन देत आहेत. एका युवकाने विदेशात त्‍याच्‍या कारला मराठा क्रांती मोर्चाचे पोस्‍टर लावले आहे. मराठा मोर्चाचे पोस्टर मिरवणारी ही कार आहे कॅनडातील हॅलीफॅक्स शहरातील. सुयोग मोरे असे या युवकाचे नाव आहे. त्‍याच्‍या त्याच्या ऑफिस आणि कॉलेजमधील अनेकांनी या पोस्‍टरची चौकशी करत मराठा क्रांती मोर्चाबाबत जाणून घेतले आहे. तो 9 लाख लोकसंख्‍या असलेल्‍या \"नोव्हा स्कॉटीया\" या प्रदेशात राहतो. येथील लोकसंख्‍येच्‍या दुप्पट, तिप्पट लोक मराठा मोर्चांसाठी जमत असलेले ऐकून तिथले लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
 
कोपर्डी येथील घटनेचा निषेध आणि आरक्षणाच्‍या मागणीला घेऊन राज्‍यातील विविध शहरांमध्‍ये मराठा क्रांती मूक मोर्चे काढले जात आहेत. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व सर्व स्‍तरातील मराठा बांधव या मोर्चामध्‍ये मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे यासाठी सोशल मीडियावरून तर, प्रचार केला जातोच शिवाय दुचाकी चारचाकी वाहनांवर स्‍टिकर्स लाऊनही मराठी क्रांती मोर्चाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत कशी पोहोचेल याचा प्रयत्‍न समाजबांधव करताना दिसतात. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला असेच काही फोटो दाखवत आहोत. 
 
 
 
 
 
 
 
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, महाराष्‍ट्रात या वाहनांव्‍दारे असाही केला जातो प्रचार..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...