आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 आॅगस्ट राेजी मराठा क्रांती मूकमोर्चा मुंबईत धडकणार, आतापर्यंत निघाले 58 मोर्चे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मूकमोर्चा ९ आॅगस्टला क्रांतीदिनी मुंबईत धडकणार असल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. राज्यात याआधी ५८ मोर्चे निघाले होते. मुंबईतील मोर्चा हा या सर्व मोर्चांपेक्षा भव्य असेल, असे समन्वयकांनी सांगितले.
 
कोपर्डीच्या घटनेनंतर सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आले होते. १३ जुलैला राज्यभरातील समन्वयक एकत्रित येऊन कोपर्डी येथे क्रांतीज्योतीला श्रद्धांजली वाहतील. मुंबईतील मोर्चा हा भायखळ्याच्या जिजमाता उद्यानापासून सीएसटी, मुंबई महापालिकेपर्यंत निघणार आहे. राज्याच्या सर्व जिल्ह्यातील मोर्चा समन्वयक एकत्र येऊन नुकतीच मुंबईत बैठक घेण्यात आली.

या वेळी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. राज्यस्तरीय समन्वय समितीची रचना करून तीन महिन्यांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आले. यासाठी राज्यभर बैठका, मेळावे व सभा घेण्यात येणार आहेत. ६ जून रोजी रायगड येथे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून पुन्हा एकदा नव्या जोमाने एकत्र येण्यासाठी शपथ घेतली जाईल.
 
बातम्या आणखी आहेत...