मुंबई - आपल्या मागण्यांसाठी लाखाेंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर येत असल्याने सरकारवर दबाव वाढत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही पद धाेक्यात अाले असल्याच्या वावड्यांना पूर्णविराम मिळाला अाहे. अारक्षणासाठी अाग्रही असलेल्या काही मराठा नेत्यांनी साेमवारी फडणवीस यांची भेट घेऊन हे माेर्चे त्यांच्याविराेधात नसल्याचे स्पष्टीकरण दिले. मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला ही माहिती दिली. मराठा अारक्षणासाठी अापण पूर्ण प्रयत्न करू, असे अाश्वासन या वेळी फडणवीसांनी या नेत्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यभर निघणारे मराठा क्रांती माेर्चे फडणवीसांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठीही काढले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अाहे. मात्र मराठा नेत्यांच्या भूमिकेमुळे या चर्चा निराधार असल्याचे अाता स्पष्ट झाले अाहे. मराठ्यांच्या जिवावर आपली घरे भरणाऱ्यांच्या विरोधात हे अांदाेलन असल्याचे काही मराठा नेत्यांचे म्हणणे आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही फडणवीसांच्या पदाला काेणताही धाेका नसल्याचा दावा केला अाहे. ‘मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. कोणतीही चूक नसताना मुख्यमंत्री बदलण्याची संस्कृती भाजपत नाही. मराठा मोर्चा आयोजकांशी सरकार चर्चा करण्यास तयार असून या चर्चेत विराेधी पक्षाच्या नेत्यांनाही सहभागी करुन घेतले जाईल,’ असेही पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे विरोधक मानले जाणारे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही मराठा समाजाचे मोर्चे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहेत असे वाटत नाही. ‘आमच्या सरकारने मराठ्यांना आरक्षण मिळावे अशीच भूमिका घेतलेली आहे. पूर्वीच्या सरकारने याेग्य पद्धतीने नियमाला धरुन हे आरक्षण दिले असते तर आज मराठ्यांवर मोर्चे काढण्याची वेळ आलीच नसती,’ असे खडसे म्हणाले.
प्रतिमोर्चे निघू नये म्हणून प्रयत्न :
दरम्यान, मराठा मोर्चामुळे दलित आणि ओबीसींमध्ये अस्वस्थता असून त्यांनीही मोर्चे काढण्याचे ठरवले आहे. असे झाले तर पुरागोमी महाराष्ट्र पुन्हा जातीभेदाच्या भिंतीत अडकून पडण्याची भीती अाहे. त्यामुळे प्रतिमाेर्चे निघू नयेत यासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न केले जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
नेत्यांनाच नकाेय विशेष अधिवेशन :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत एक दिवसाचे अधिवेशन घेण्याची सूचना केली आहे. मात्र जर सरकारने असे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला तर अनेक मराठा नेते स्वतःच अधिवेशन नको म्हणतील. कारण अधिवेशनात मराठा नेते जे काही बोलतील ते रेकॉर्डवर येईल आणि त्याचा वेगळा परिणाम होऊ शकतील, अशी शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.
मूकमोर्चा मुंबईत ‘बोलका’ होणार
औरंगाबाद - मुख्यमंत्र्यांनीमागण्या मान्य केल्या नाहीत तर मुंबईत मराठा समाजाचा मोर्चा मूक राहणार नाही, असा इशारा सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मोर्चेकऱ्याशी बोलावे, असाही आग्रह धरण्यात आला.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, आता मुस्लिम मोर्चा...