आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चांनी सरकार अस्वस्थ, भाजप नेत्यांना लावले कामाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘काेपर्डी’च्याघटनेनंतर राज्यात मराठा समाजाचे मूकमाेर्चे निघत असून त्यात लाखाेंच्या संख्येने लाेक सहभागी हाेत असल्याने भाजप राज्य सरकार अस्वस्थ झाले अाहे. या माध्यमातून सरकार आणि पक्षाबद्दल कटुता निर्माण होऊ नये म्हणून भाजपमधील मराठा नेत्यांना या मोर्चात सामील होण्याचे तसेच मोर्चेकऱ्यांशी आपापल्या स्तरावर संवाद साधून हे मोर्चे सरकारविरुद्ध जनक्षाेभाचे रूप घेऊ नयेत याची खबरदारी घेण्याच्या सूचना भाजपने दिल्या अाहेत.

औरंगाबाद, बीड, परभणीत लाखांचे मोर्चे निघाले. अाता मुंबईत ७५ लाखांचा मराठा क्रांती मोर्चा आयोजित करण्याचे नियोजन सुरू अाहे. त्यामुळे ‘मोर्चा आयोजकांशी चर्चा करू,’ असे गाजर मुख्यमंत्र्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या मोर्चाची सूत्रे अराजकीय तरुणांच्या हाती गेल्याने मुख्यमंत्र्यंाच्या या खेळीला फारशी दाद मिळण्याची शक्यता दिसत नाही. ‘लोकशाहीत लाखांचे मोर्चे निघाल्यानंतर भलेही यात सरकारविरोधी काहीही बोलले जात नसले तरी सरकार अस्वस्थ होईल,’ अशी प्रतिक्रिया भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्याने दिली.

मराठा समाजात खदखद असलेले अनेक प्रश्न आघाडी सरकारच्या काळात तीव्र झाले असले तरी गेल्या दाेन वर्षातही ते साेडवण्यासाठी समाधानकारक पावले उचलली नसल्याची तक्रार या समाजाची आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतील मराठा नेत्यंाविरुद्ध आक्रोश असला तरी काही दिवसांनी या आक्रोशाला ब्राह्मण विरुद्ध मराठा असा रंग काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते देतील, अशी भीती भाजपमधील रणनीतीकारांना वाटते. मराठा सेवा संघाने तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले अाहे. एवढेच नव्हे तर हे मोर्चे म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण देण्याच्या निर्णयाविरुद्ध जनक्षोभ असल्याचा दावाही त्यांनी केला अाहे. त्यामुळे भविष्यात या मोर्चाची धार कुणाच्या विरुद्ध राहील याचे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत. त्यामुळे भविष्यात अशा माेर्चात आयोजनापासून प्रत्यक्ष अधिकाधिक सक्रिय सहभाग दाखवून भाजप पक्ष मराठा समाजासोबत आहे हे दाखवून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पक्षामार्फत दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

‘ही तर स्वार्थी मराठा नेत्यांविरूद्धची नाराजी’
मराठा क्रांती मूक मोर्चे हे कोणत्याही जाती वा समाजाविरूद्ध नसून मराठा समाजाचे हे मूक आत्मपरीक्षण अाहे, अशी भूमिका मराठा सेवा संघाने घेतली अाहे. हे मोर्चे मराठा समाजातील स्वार्थी नेत्यांविरूद्धही असल्याचे सांगतानाच मराठा आरक्षणासाठी रामदास अाठवले करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल सेवा संघाने कौतुक केले आहे. ‘मराठा समाजातील प्रश्न साेडविण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे अाश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळले नाही, हा आक्षेपही माेर्चातून मांडला जात असल्याचे मराठा सेवा संघाचे प्रदेश सरचिटणीस मधुकर मेहकरे यांनी निवेदनात म्हटले अाहे.
बातम्या आणखी आहेत...