आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चातून परतताना भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत 2 ठार, एक जण गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठा मोर्चातून परतताना झालेल्‍या अपघात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक जण जखमी असून त्याच्यावरप उपचार सुरू आहेत. मुंबईतील वडाळा भागात भरधाव ट्रकने एका दुचाकीला धडक दिल्‍याने हा अपघात झाला. विनायक ढगे, सिद्धेश मासे अशी अपघातात ठार झालेल्‍या दोघांची नावे आहेत. तर, सिद्धेश चव्हाण हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
 
ट्रकचालकाला अटक
पोलिसांनी आरोपी ट्रक ड्रायव्हरला अटक केली असून, त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ड्रायव्हरची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने दारु पिऊन ट्रक चालवल्याचे स्पष्ट झाले आहे. 
बातम्या आणखी आहेत...