आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिष शेलार, नितेश राणेंना हिसका! नेतेगिरी नको, मागण्या पूर्ण करा; मोर्चेकऱ्यांनी सुनावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लाखाेंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या माेर्चात अनेक राजकीय नेतेही सहभागी झाले हाेते. मात्र ‘चमकााेगिरी’ करणारे भाजप आमदार अाशिष शेलार तसेच काँग्रेस आमदार नितेश राणे यांची हुर्यो उडवून अांदाेलकानंी त्यांना मोर्चातून बाहेर जाण्यास भाग पाडले.  माेर्चाच्या मंचावर आलेल्या नितेश राणेंच्या उपस्थितीबाबत अांदाेलकांनी हरकत घेतली. आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. ठोस आश्वासन दिलेले नसताना तुम्ही मंचावर काय करता, असा आक्षेप घेत त्यांनी नितेश यांना घेराव घातला. यावेळी मोर्चेकरी आणि नितेश यांच्यामध्ये वादही झाला. 

या वादानंतर मोर्चातून वाट काढत नितेश आझाद मैदानातून बाहेर पडले. छत्रपती संभाजी राजे हे नितेश राणेंना स्टेजवर घेऊन गेले. मोर्चाचे आभार मानल्यानंतर  त्यांनी माईक नितेश यांच्या हाती दिला, पण माेर्चेकरांनी त्यांना बोलू तर दिले नाही, भाजपचे मुंबई अध्यक्ष अाशिष शेलार हेही माेर्चात सहभागी हाेण्यासाठी अाले हाेते, परंतु आंदोलकांनी विरोधात घोषणाबाजी करत त्यांनाही आझाद मैदानात येण्यापासूनही रोखले. ‘आधी आरक्षण द्या, मग मोर्चात या’ असे माेर्चेकऱ्यांनी त्यांना सुनावले. ‘सरकार तुमचे आहे, मग इतके महिने आम्हाला मोर्चे का काढावे लागतात. आता तुम्ही येथून जा. आम्हाला तुमच्यासारखे नेते मोर्चात नको आहेत. आधी मागण्या पूर्ण करा’, असे मोर्चेकरांनी सांगताच शेलारांनी काढता पाय घेतला.
बातम्या आणखी आहेत...