आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चाचा इशारा: मागण्यांचा विचार करा; अन्यथा सर्व जबाबदारी राज्य सरकारची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘मराठा माेर्चाच्या अातापर्यंत निघालेल्या ५७ माेर्चांमध्ये संबंधित जिल्ह्यांमधून ५७ निवेदने राज्य सरकारला देण्यात अाली अाहेत. पण अातापर्यंत त्यासंदर्भात काेणतेही उत्तर सरकारने दिलेले नाही. त्यामुळे मुंबईत ९ अाॅगस्टला धडकत असलेला मराठा माेर्चा ही सरकारसाठी शेवटची संधी अाहेे. सरकारने सर्व निवेदनांचा गांभीर्याने विचार करावा; अन्यथा त्यानंतर हाेणाऱ्या परिणामांना राज्य सरकार जबाबदार असेल,’ असा इशारा मराठा क्रांती माेर्चाच्या समन्वय समितीने साेमवारी दिला.  
 
मुंबईत ९ अाॅगस्टला हाेणाऱ्या मराठा क्रांती माेर्चाच्या तयारीचा अाढावा घेण्यासाठी महाराष्ट्र समन्वय समितीच्या प्रतिनिधींनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद अायाेजित केली हाेती.  मुंबईत हाेणारा हा शेवटचा मूकमाेर्चा अाहे; पण अांदाेलन थांबलेले नाही. हा सर्वात माेठा माेर्चा अाहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अामचा अंत पाहू नये. या महामाेर्चानंतर सरकारने जर अामच्या मागण्या मंजूर केल्या नाहीत, तर मराठ्यांचा संयम सुटू शकताे अाणि त्यानंतर निर्माण हाेणाऱ्या परिस्थितीला मात्र सरकारच जबाबदार असेल.  त्यामुळे हा शेवटचा मूकमाेर्चा अाहे असा समज सरकारने करून घेऊ नये. हा फक्त शेवटचा मूकमाेर्चा अाहे; पण यापुढेही अांदाेलन सुरूच राहील, असा इशारा राज्याच्या अाठ जिल्ह्यांमधून अालेल्या समन्वयकांनी दिला.  

५७ माेर्चे काढल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने मुंबईला यावे लागत अाहे. त्यामुळे ८ ते ९ अाॅगस्टला लाखाेंनी लाेक मुंबईत येणार अाहेत. पण शासन गंभीर नाही. अाम्ही मानाने येत अाहाेत. अाम्हाला मान द्यायचा अाहे की अपमान करायचा अाहे, हे शासनाने ठरवले पाहिजे. मागच्या सरकारने अारक्षण दिल्यानंतर काेणीतरी काेर्टात जाऊन ते  थांबवले. सरकसकट कर्जमाफी, मराठा अारक्षण, स्वामिनाथन अायाेगाची अंमलबजावणी, अाेबीसींना मिळणाऱ्या सुविधा अामच्या समाजाला मिळाल्या पाहिजेत या माेर्चातील प्रमुख मागण्या असल्याचे साेलापूर जिल्ह्याचे समन्वयक माउली पवार म्हणाले. या माेर्चासाठी पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक संख्येने शेतकरी सहभागी हाेत अाहेत. सरकारने अारक्षण नाही दिले तर राजीनामा द्यावा, असे मत  अहमदनगर नगर मराठा क्रांती माेर्चा समन्वयक व शेतकरी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी व्यक्त केले.   

मराठा क्रांती माेर्चा अातापर्यंत शांततेतच निघाला असून काेणत्याही प्रकारच्या कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे ९ अाॅगस्ट  रोजी महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठा बांधवांची सुरक्षा ही राज्य सरकारने केली पाहिजे, अशी अामची मागणी असल्याचे काेल्हापूरचे समन्वयक दिलीप पाटील यांनी या वेळी सांगितले.  

‘मूकमाेर्चे पटत नसतील तर विध्वंसक अांदाेलन’ 
अॅट्राॅसिटीच्या गैरवापराविरोधात विदर्भातून माेर्चे निघाले. नागपूर अधिवेशनादरम्यान पहिला राज्यस्तरीय माेर्चा झाला हाेता. त्या वेळी मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांनी अामच्या मागण्या काही कालावधीत पूर्ण करण्याचे अाश्वासन दिले हाेते. सहा महिने उलटले तरीही मागण्या मान्य झाल्या नाहीत. मूकमाेर्चे पटत नसतील तर अाम्ही विध्वंसक अांदाेलन करणे सरकारला अपेक्षित अाहे का, असा सवाल अमरावतीचे समन्वयक नितीन पवित्रकार यांनी केला.

माेर्चात हरवलेल्यांचा शाेध घेणार ‘रायगड’
नाशिक- मुंबईतील माेर्चास नाशिकमधून ५ लाखांपेक्षा अधिक समाजबांधव दाखल हाेतील, असा दावा संयाेजकांनी केला असून माेर्चात हरवलेल्या सहकाऱ्यांना शोधण्यासाठी ‘रायगड’ नावाचे अॅप्लिकेशन विकसित करण्यात अाले अाहे. यात सहकाऱ्याचे ‘लाेकेशन’ मिळू शकणार अाहे. शिवाय काेठे किती ट्रॅफिक अाहे याचीही माहिती याद्वारे मिळेल.

मुंबईतील मराठा क्रांती माेर्चाच्या तयारीसाठी नाशिकमध्ये साेमवारी (दि. ७) अंतिम नियाेजन बैठक घेण्यात अाली. या वेळी माेर्चाचे नियाेजन सांगण्यात अाले. मुंबईत हाेणाऱ्या माेर्चात सुसूत्रता असावी, शिस्तीचे काटेकाेर पालन व्हावे, दुसऱ्यांना या माेर्चाचा त्रास हाेऊ नये, हा माेर्चा संपूर्ण देशासाठी अादर्शवत ठरावा या दृष्टीने नियाेजन करण्यात अाल्याचे सांगण्यात अाले. या माेर्चासाठी विक्रम कदम अाणि त्यांच्या परिवाराने रायगड हे अॅप्लिकेशन विकसित केले अाहे. याद्वारे अापल्याबराेबरील सहकारी काेणत्या स्थळी अाहे याची माहिती मिळू शकेल. 
बातम्या आणखी आहेत...