आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा, मुस्लिम आरक्षण धोक्यात, बापट अहवालाचे काय झाले? कोर्टाची विचारणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारने 2008 मध्ये नेमलेल्या न्यायमूर्ती बापट यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगाचे काय झाले? तो अहवाल अद्याप अधिवेशनात का मांडला नाही, अशी विचारणा करीत मुंबई हायकोर्टाने राज्यसरकारला फटकारले. तसेच याबाबत पुढील 20 दिवसात सरकारने आपले म्हणणे मांडावे असे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, धर्मानुसार आरक्षण देता येणार नाही असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्याने मुस्लिम आरक्षणातून मुस्लिम शब्द वगळण्याच्या सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत.
मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारने 2008 साली बापचट आयोगाची नेमणूक केली होती. त्याचा अहवाल वर्षभरात बापट आयोगाने सरकारला दिला होता. मात्र सरकारने तो विधिमंडळात मांडला नाही. याप्रकरणी राजाराम खरात यांनी 2009 मध्ये हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मंगळवारी या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती ए. एस. चांदुकर यांच्या खंडपीठापुढे झाली.
मराठा आरक्षण जाहीर करताना सरकारने बापट आयोगाच्या अहवालाला केराची टोपली दाखवली आहे. तसेच त्यांच्या निष्कर्ष व अहवाल पुढे येऊ नयेत म्हणून तो विधिमंडळात मांडला नाही. बापट हे हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती राहिले आहेत. त्यांच्या आयोगाकडे डोळेझाक करीत सरकारने आपल्या सोईसाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली समिती नेमली व या समितीने मराठा समाजाला 20 टक्के आरक्षण द्यावे अशी शिफारस केली होती. त्यानुसार सरकारने राजकीय निर्णय घेत मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे जनहित याचिकाकर्ते
खरात यांनी आपल्या वकीलामार्फत बाजू मांडली तसेच बापट आयोगाकडे का दुर्लक्ष केले व तो विधिमंडळात का मांडला नाही असे म्हणत कोर्टात धाव घेतली आहे. अखेर याप्रकरणी हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे. तसेच 20 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. एकूनच मराठा आरक्षण धोक्यात आले आहे.
छायाचित्र- मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातील विविध पक्षाच्या व समाजाच्या आमदारांनी मागणी केली होती त्यावेळचे छायाचित्र....
पुढे वाचा, मराठा व मुस्लिम आरक्षण सरकारवर बूमरॅंग होण्याची शक्यता...