आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठ्यांना आरक्षण दिले तर फक्त ७५०० नोकऱ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बदलत्या अर्थकारणाने मराठा समाजासमोर गंभीर प्रश्न उभे केले आहेत. या समाजाला उद्या आरक्षण मिळाले तरी केवळ ७५०० नोकऱ्या मिळणार आहेत, त्यामुळे केवळ आरक्षण देऊन मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले. मराठा आरक्षणाचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात असताना आणि त्यावर बाजू मांडण्यासाठी राज्य सरकार तयारी करीत असताना तावडे यांचे हे वक्तव्य महत्वपूर्ण ठरणार आहे.

कामगार चळवळीतील कार्यकर्ते अजित सावंत यांच्या ‘उठाव झेंडा बंडाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात तावडे बोलत होते. मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघताहेत आणि आरक्षण दिले तरी नोकऱ्या केवळ साडे सात हजार मिळतील. त्यामुळे आरक्षण दिले म्हणून मराठा समाजाचे प्रश्न सुटतील, असे म्हणता येईल का? ,अशा शब्दात तावडे यांनी सरकारची बाजू मांडली.
मिल ते माॅलचे दस्तावेजीकरण : सावंत यांचे उठाव झेंडा बंडाचा हे अजित सावंत यांचे पुस्तक म्हणजे मिल ते मॉल, गिरणी कामगार ते आयटी (माहिती तंत्रज्ञान) कामगार असा गेल्या १५ वर्षात झालेल्या बदलांचा
दस्तावेजच आहे, असे
तावडे म्हणाले.
या काळात आर्थिक आणि कामगार क्षेत्रात झालेल्या स्थित्यंतरंाचा सावंत यांनी उत्तमरीतीने आढावा घेतला आहे, अशा शब्दात तावडे यांनी या पुस्तकाचे कौतूक केले. विशेष म्हणजे विनोद तावडे आणि अजित सावंत दोघेही श्रम विज्ञान संस्थेचे विद्यार्थी आणि वर्गमित्र आहेत.
दुसरी बाजू पटवून सांगण्याचा प्रयत्न
मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचे तावडे हे अध्यक्ष आहेत. सरकारने प्रयत्न करूनही उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यास आक्रोश निर्माण होऊ नये म्हणून आतापासून आरक्षणाची दुसरी बाजूही पटवून देण्याचे प्रयत्न राज्य सरकारतर्फे केले जात असल्याचे संकेत तावडेंच्या या वक्तव्यामुळे प्राप्त झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...