आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maratha Reservation Issue, Mla Vinayak Mete Attack On Munde bhujbal

मराठा आरक्षणाला मुंडे-भुजबळ या राहू-केतूचा अडसर -विनायक मेटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात मराठा आरक्षण देण्यास कोण विरोध करीत असतील तर ते छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे हेच करीत आहेत. राजकारणातील भुजबळ-मुंडे या राहू-केतू जोडीला बाजूला केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही त्यामुळे त्यांना खड्यासारखे काढायला हवे. येत्या काळात मराठा समाजाला हे काम करावेच लागेल, असे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांनी मराठा समाजाला साद घातली.
पनवेल येथे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी तसेच सरकारला जागे करण्यासाठी पनवेल कर्नाळा स्पोर्टस अकादमी येथे शिवसंग्राम संघटनेतर्फे मराठा आरक्षण इशारा मोहिम मेळाळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मेटे बोलत होते.
मेटे म्हणाले, राज्यातील जेष्ठ नेते म्हणवून घेणारे गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ हे दोघेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात खरे अडथळे आहेत. या राहू-केतू जोडीला राजकारणातून हद्दपार केल्यास मराठा समाजाला आरक्षण आपोआप मिळेल. मुंडे हे तर मराठा समाजाचा कायमच अपमान करीत आले आहेत.
पुढे वाचा, मेटेंनी कोणा-कोणावर हल्लाबोल केला....