आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्थापतांविराेधात मराठ्यांचा अाक्राेश सर्वांपर्यंत पाेहाेचवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठा समाजाला घाबरून जाण्याची गरज नाही. हा मोर्चा आपल्याविरोधातील नाही. या समाजाचा आक्रोश हा ४० वर्षांचा असून तो काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमधील प्रस्थापित नेत्यांच्या विरोधातील आहे. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. लाेकांना आपण काय करत आहोत, ते सांगा. अन्यथा असा आक्रोश आपल्याविरोधात पुढे येईल, असा आक्रमक पवित्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकारिणीत बुधवारी घेतला.

वसंत स्मृती भवनमध्ये आयोजित भाजप प्रदेश कार्यकारिणीवर मराठा आरक्षणचेच सावट दिसून आले. कार्यकारिणी बैठकीत आमदार, खासदार, नेते व पदाधिकाऱ्यांत आरक्षणाच्या विषयाची चर्चा होती. कार्यकारिणी बैठक बुधवार आणि गुरुवारी होणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले, सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, याला आधीचे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार जबाबदार आहे. पंधरा वर्षे सत्तेत राहूनही या सरकारने मराठा आरक्षणाविषयी काहीच केले नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठ्यांना १५ टक्के, तर मुस्लिमांना ५ टक्के आरक्षणाची घोषणा केली. मात्र, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या राणे समितीने अहवालात इतक्या त्रुटी करून ठेवल्या की आरक्षण न्यायालयात टिकूच शकले नाही. राणे समितीने आरक्षणाविषयी पुरावे दिले असते तर ही वेळ आली नसती, असेही फडणवीस यांनी सांगितले.
आरक्षणासाठी मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत असताना आता या मोर्चात सहभागी होऊन काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते युती सरकारला आरक्षणाविषयी दोष देत आहेत. हा प्रकार म्हणजे आपले पाप दुसऱ्याच्या माथी मारण्यासारखा आहे. यानिमित्त सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांचा डाव असेल तर तो कधीच साध्य होणार नाही. कारण महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे, असेही फडणवीस म्हणाले.

विरोधकांच्या कुंडल्या हाती : विरोधकांचे नाक दाबण्यासाठी माझ्याकडे अनेकांच्या कुंडल्या आहेत. ही सारी अस्त्रे मी सांभाळून ठेवली आहेत. कुठले अस्त्र कधी वापरायचे हे मी ठरवणार. तुम्ही िवरोधकांची काळजी करू नका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना न डगमगता सामोरे जा. आक्रमक राहून आपण केलेली कामे जनतेसमोर मांडा, असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतला.

मराठा आरक्षण ठराव आज
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मराठा आरक्षणाचा ठराव गुरुवारी (६ आॅक्टोबर) मांडला जाणार आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या हा ठराव मांडतील. जनसंघाचे भाजपमध्ये रूपांतर झाल्यानंतर अद्याप पक्षाच्या कार्यकारिणीवर एखाद्या समाजाच्या आरक्षणावर ठराव मांडण्याची वेळ कधी आली नव्हती; पण लाखोंच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यात निघणाऱ्या मोर्चांची दखल या सरकारला घ्यावी लागली असल्याचे हे प्रतीक असल्याचे बोलले जाते. कार्यकारिणीचा समारोप ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...