आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍यांना धडा शिकवू : विनायक मेटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍या नेत्यांची ‘हिटलिस्ट’ बनवून निवडणुकीत त्यांना धडा शिकवू,’ असे आव्हान शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आपल्याच सरकारमधील नेत्यांना दिले.

मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाच्या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने सोमवारी विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेच्या शिष्टमंडळाला न भेटताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निघून गेल्याने आंदोलक संतप्त झाले होते. दुपारी बाराच्या सुमारास भायखळ्याच्या राणी बागेपासून विधान भवनाकडे निघालेला हा मोर्चा आझाद मैदानात अडवण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेसाठी आलेल्या शिष्टमंडळाला विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अडवण्यात आल्याने मेटे यांनी तेथेच ठिय्या मांडला. त्यानंतरही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाची भेट न घेतल्याचा आंदोलकांनी निषेध केला. अखेर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या आंदोलकांशी चर्चा केली.

पत्रकार परिषदेत मेटे यांनी सरकारने या चालवलेल्या चालढकलीचा निषेध केला. सरकारने अनेक समाजांचा ओबीसींमध्ये समावेश करत त्यांना आरक्षणाचा लाभ दिला, मात्र मराठय़ांवरच जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसांत अधिक उग्र आंदोलन छेडणार असून उद्याच या आंदोलनाची रूपरेषा ठरणार असल्याचे ते म्हणाले.