आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maratha Reservation Pending Teachers Seats Issue

मराठा आरक्षणातील रिक्त शिक्षकांच्या जागा भरा : मुंबई उच्च न्यायालय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मराठा आरक्षणाच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे या राखीव कोट्यातील रिक्त असलेल्या शिक्षक प्राध्यापकांच्या जागा तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात याव्यात,’ असे निर्देश उच्च न्यायालयाने मंगळवारी शिक्षण संस्थांना दिले.

आघाडी सरकारने राज्यात मराठा समाजासाठी नोकरी शिक्षणात १६ टक्के आरक्षण लागू केले होते. मात्र नोव्हेंबर २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा आरक्षणासाठी राखीव असलेली पदे अद्याप भरण्यात आलेली नाही. ही पदे तत्काळ भरावीत, यासाठी उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यावर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ‘मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर या राखीव जागा रिक्त का ठेवण्यात आल्या? या जागा तातडीने भराव्यात, रिक्त पदांवर ११ महिन्यांसाठी तात्पुरत्या नियुक्त्या करून बेरोजगारांना रोजगार द्यावा,’ असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्यात होणार आहे.