आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा अारक्षण देणारच , तावडे यांची सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठा समाजातील मुलांना नाेकरीत सामावून घेण्यासाठी लागू झालेल्या अारक्षणानुसार निवड झाली असली तरी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात अालेले नाही, अशा नियुक्ती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर चाैकशी करून कठाेर कारवाई करणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी विधान परिषदेत दिली. मराठा समाजाला अारक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून १६ टक्के अारक्षण देण्यात अाल्यानंतरही सहा महिन्यांच्या कार्यकाळातील अारक्षणाची अमलबजावणी हाेत नसल्यासंदर्भातील लक्षवेधी सदस्य विनायक मेटे यांनी उपस्थित केली हाेती. त्याला उत्तर देताना तावडे म्हणाले की, मराठा समाजाला ९ जुलै २०१४ राेजी एका अादेशान्वये शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून १६ टक्के अारक्षण देण्याचा निर्णय घेण्यात अाला. १४ नाेव्हेंबर २०१४ पर्यंत या अादेशाची अमलबाजावणी करताना या सहा महिन्यांच्या काळात ज्या उमेदवारांची अारक्षणानुसार निवड झाली. त्यांना काही जिल्ह्यात नियुक्तीपत्रे देण्यात अाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.