आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maratha Reservation,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही : छगन भुजबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठा आरक्षणाला माझा कधीच विरोध नव्हता. आजही नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. फक्त हे आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये. त्यांच्या हक्काचं संरक्षण झालं पाहिजे. कारण देशात आणि राज्यात 54 टक्के ओबीसी आहेत. ओबीसी प्रवर्गात महाराष्ट्रातील सुमारे 370 जाती, माळी, साळी, कोळी, धनगर, वंजारी, तेली, कुंभार, सुतार आणि विमुक्त जमाती आदी येतात. मी जी भूमिका मांडली, तीच भूमिका शरद पवार साहेबांची आहे. सन्मानीय मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचीही आहे. मुंडेसाहेबांचीदेखील हीच भूमिका होती, असं सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून भुजबळ यांनी नेटिझन्सशी दोन तास संवाद साधला.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून सुमारे चाळीस हजार फेसबुक यूझर्स या चॅटमध्ये सहभागी झाले होते. जवळ जवळ एक हजार कमेंट्स आल्या. त्यातल्या 200 कमेंट्सना भुजबळांनी सर्मपक उत्तरे दिली. तसेच 200 च्या वर कमेंट्स लाइकही केल्या. मराठा आरक्षणाविषयी होणार्‍या टीकेलाही भुजबळांनी उत्तरं दिली. ते म्हणाले की, मंत्रिमंडळात मी कधीच मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही. परंतु काही राजकारणी मंडळींनी आपलं राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी मी मराठा आरक्षण विरोधी आहे, असा खोटा प्रचार केला आणि करत आहेत. मराठा आरक्षण योग्य त्या कायदेशीर बाबीत बसवून जाहीर केलं जाईल, याची मला खात्री आहे, असेही ते शेवटी म्हणाले.