आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रंगभूमी’ मोठ्या पडद्यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी रंगभूमीवर काम करणार्‍या दिग्गज कलावंतांनी मराठी सिनेसृष्टीत वेगळा ठसा उमटवला. सिनेसृष्टीला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि मराठी मातीतले कलाकार देणारी ही रंगभूमी आता मोठ्या पडद्यावर चमकणार आहे ती ‘रंगकर्मी’ या चित्रपटाद्वारे!
रंगभूमीवर अभिनय करणारे, मेकअप करणारे, नेपथ्य करणारे, बॅक स्टेज काम करणारे, अभिनेता होण्याच्या मिषाने पडेल ते काम करणारे अशा सर्वच जिवांच्या वेगवेगळ्या कहाण्या सापडतात. व्यावसायिक रंगमंचाशी निगडित सर्व बाबी तसेच रसिक प्रेक्षकांशी असलेले रंगकर्मींचे नाते, वैयक्तिक आयुष्यात खाचखळगे, प्रसंगी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली असली तरी तितक्याच ताकदीने रंगमंचावर उभा ठाकणारा अशा सर्वांचे चित्रण करणारा ‘रंगकर्मी’ हा चित्रपट
असेल. या मुहूर्ताच्या प्रसंगी कमलाकर सोनटक्के, लता नार्वेकर, सुधीर भट, पंढरीनाथ जुकर, विजय केंकरे आदी कलावंतांचा गौरव करण्यात आला.
दिग्गज कलावंत काम करणार
या चित्रपटात मोहन जोशी, शर्मिष्ठा राऊत, डॉ. अमोल कोल्हे, शीतल दाभोळकर, डॉ. गिरीश ओक, निशा परुळेकर आदी विविध भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संजीव कोलते यांचे असून सुमीत मोशन पिक्चर्स यांची निर्मिती आहे.