आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathi Actor Mohan Joshi Is Akhil Bharatiya Marathi Natya Parishad President

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी मोहन जोशी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाच्या महानाट्यानंतरही अनेक कारणामुळे गाजलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी अखेर अभिनेते मोहन जोशी यांची निवड झाली. जोशी यांनी अभिनेते व दिग्दर्शक विनय आपटे यांचा दणदणीत पराभव करून दुसर्‍यांदा अध्यक्षपदाचा मान पटकावला.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मोहन जोशी पुरस्कुत उत्स्फूर्त पॅनेलने व विनय आपटेंच्या परिवर्तन पॅनेलने मुंबई विभागातून प्रत्येकी आठ मते मिळाली होती.

माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलात आज (रविवारी) नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या झालेल्या बैठकीत मोहन जोशी यांची निवड झाली. जोशी यांना 27 तर आपटे यांना केवळ 12 मते मिळाली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची यंदाची निवडणूक खूपच वादग्रस्त ठरली होती. मतपत्रिका गहाळ होणे, बोगस मतदान होणे त्यानंतर त्यावर तोडगा काढण्यासाठी त्रिसदस्सीय समितीची स्थापनाही करावी लागली होता. मोहन जोशी यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर या महानाट्यावर पडद पडला.