आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Box Cricket League To Give Different Meaning To Sports

तिसरी "एमबीसीएल' कोल्हापुरात रंगणार, फटाका औरंगाबाद टीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी कलाकारांकरिता बॉक्स क्रिकेट लीगची सुरुवात महाराष्ट्र कलानिधीने दोन वर्षांपूर्वी केली होती. मराठी बॉक्स क्रिकेट लीगचे तिसरे पर्व कोल्हापूर येथे चार ते सहा मेदरम्यान होणार असून विजेत्या टीमला प्रथमच रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी रत्नागिरी टीम विजेती ठरली होती. यंदा या चषकावर आपले नाव कोरण्यासाठी नाशिक आणि औरंगाबादच्या टीमने जोरदार तयारी केलेली आहे.

एमबीसीएलच्या तिसऱ्या पर्वाची जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकतीच घोषणा करण्यात आली. या वेळी मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील नामवंत कलाकार उपस्थित होते. महाराष्ट्र कलानिधीचे सरचिटणीस सुशांत शेलार यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले, क्रिकेट सगळ्यांनाच आवडते. बॉक्स क्रिकेट हा क्रिकेटमधील अनोखा प्रकार असून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. हा फॉरमॅट घेऊन आम्ही दोन वर्षांपूर्वी एमबीसीएलला सुरुवात केली. आणि दोन वर्षातच ही स्पर्धा प्रचंड लोकप्रिय झाली. गेली दोन वर्षे आम्ही विजेत्या संघाला फक्त ट्रॉफी देत होतो परंतु यंदा प्रथमच आम्ही विजेत्या संघास अडीच लाख तर उपविजेत्या संघाला सव्वा लाख रुपयांचे बक्षीस देणार आहोत. ही रक्कम छोटी आहे परंतु ही ११ लाख रुपयांपर्यंत नेण्याचा आमचा विचार आहे. यंदा चुरस मोठी असून नाशिक, औरंगाबादसह सगळ्याच टीमने चांगली तयारी केलेली आहे.

गतवर्षीच्या विजेत्या रत्नागिरी टीमचा कप्तान सिद्धार्थ जाधवने सांगितले, कलाकारांना एकत्र आणण्यासाठी ही स्पर्धा मोठे काम करीत आहे. रोख रकमेचा पुरस्कार नसतानाही अनेक कलाकार या स्पर्धेशी जोडले गेले आहेत. आणि आणखी कलाकार येऊ इच्छित आहेत. यंदा नवी मुंबई टीम नव्याने समाविष्ट करण्यात आल्याने चुरस वाढलेली आहे.

या वेळी महाराष्ट्र कलानिधीतर्फे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या अभिनेत्री विद्या पटवर्धन यांना ५० हजारांची मदत देण्यात आली. तसेच शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्लाच्या बसला झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बॅक स्टेज आर्टिस्ट आनंद मोघे यांच्या कुटुंबीयांनाही ५० हजारांची मदत करण्यात आली.
फटाका औरंगाबाद टीम
संदीप पाठक, चंद्रकांत कुलकर्णी, अभिजित कवठाळकर, मंगेश देसाई, अनिरुद्ध हरीप, सीमा कदम, नम्रता गायकवाड, माधव देवचाके, स्नेहा देशमुख, नियाज आणि उन्मेष जगताप
क्लासिक नाशिक टीम : रवीजन्नावर, गायत्री देशमुख, भूषण मतकरी, अंकित मगरे, धनंजय धुमाळ, धनश्री क्षीरसागर, समीर विजयन, अनिता दाते, अभिजित खांडकेकर, चिन्मय उदगीरकर, मृणाल दुसानीस, प्रमोद लोखंडे आणि विनोद पांडे.