आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणुकीत भरला 'मराठी' रंग; सर्वच पक्षांनी प्रचारात उतरवले महाराष्ट्रातील नेते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गुजरात विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते प्रचार करताना दिसत आहेत. गुजरातमधील मराठीबहुल मतदारसंघामध्ये ते प्रामुख्याने ते प्रचार करत आहेत. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार येथील गुजरामध्ये स्थायिक झालेल्याचे मतदान राजकीय पक्षांकडून विशेष विचारात घेतले जात आहे.

 

गुजरातमध्ये शिवसेनेने 40 उमेदवार उभे केले आहेत. मराठीबहुल मतदारसंघात हे उमेदवार करण्यात आले आहेत. शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे गुजरातमध्ये प्रचार करत आहेत. दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपच्या प्रचारासाठी गुजरातमध्ये फिरत आहेत. काँग्रेसचे नेते हिंगोलीचे खासदार राजीव सातव हे गुजरातमध्ये स्टार प्रचारक म्हणून प्रचार करत आहेत. त्यामुळे गुजरातच्या निवडणुकीत मराठी रंग भरला आहे.

 

पुढील स्लाईडवर फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...