आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Director Chandrakant Kulkarni And Prashant Dalavi On Stage

चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी नव्या नाटकासह पुन्हा रंगमंचावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उत्तमोत्तम कलाकृतींसह प्रेक्षकांच्या मनावर गारूड करणारे, संवेदनशील लेखक आणि दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आलेले प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी ही जोडगोळी आता नव्या कोर्‍या नाटकासह पुन्हा एकदा रंगमंचावर येत आहेत.

मराठवाड्यातील कलावंतांची संपूर्ण टीम घेऊन मुंबईत करिअर करण्यासाठी आलेल्या चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, प्रतीक्षा लोणकर, प्रतिमा जोशी यांच्यासारख्यांनी एकत्रितपणे ‘जिगिषा क्रिएशन्स’ ही छोटी निर्मिती संस्था स्थापन केली. 11 मे रोजी या संस्थेला 30 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नवे कोरे नाटक रंगभूमीवर आणत असल्याची घोषणा करण्यात आली.

दिग्दर्शकाच्या खुर्चीवर चंद्रकांत कुलकर्णी असले तर कलाकृतींच्या पानाआड लेखक प्रशांत दळवी असणारच. आजवर अनेक मराठी नाटकांमधून या दोन कलावंतांनी रंगभूमीचे अवकाश विस्तारले. ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’, ‘कदाचित’ आणि इतर चित्रपटातूनही या लेखक दिग्दर्शक द्वयींची संवेदनशीलता दिसून आली आहे. त्यामुळे नव्या नाटकाकडून अपेक्षा आहेत.