आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बॉयकट’ करा, दोन हजार रुपये मिळवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्राच्या जत्रांमध्ये फिरणार्‍या चित्रपटांची दुनिया दाखवणार्‍या तृप्ती भोईर निर्मित ‘टुरिंग टॉकीज’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भोईर यांनी एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेची घोषणा केली आहे. चित्रपटातील टॉम बॉय भूमिकेत असलेल्या तृप्ती भोईरसारखे केस ‘बॉयकट’ करून दोन हजार रुपये रोख आणि चित्रपटाचे 1 तिकीट मोफत असा हा नवा फंडा आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी भोईर यांनी सर्व महिलांना आवाहन केले आहे.
जत्रांमध्ये तंबूत लागलेल्या चित्रपटांकडे गर्दी खेचण्यासाठी तंबूमालक विविध क्लृप्त्या लढवत असतात. कधी शॅम्पू, कधी साबण तर कधी हिरोइनच्या हातून तिकिटे अशा अनेक प्रलोभनांचा वापर करून चित्रपटाला जास्तीत जास्त प्रेक्षक मिळवतात. जत्रांमध्ये होणार्‍या अशा प्रमोशन्सचा वापर तृप्ती यांनी आपल्या ‘टुरिंग टॉकीज’ या चित्रपटासाठी करून घेण्याचे ठरवले आहे. या चित्रपटात त्यांनी ‘टॉमबॉय’ तंबूचालक ‘चांदी’चे काम केले आहे. जी कोणी धडाकेबाज महिला आपल्या मोठ्या केसांना कात्री लावून चक्क बॉयकट करेल आणि तृप्तीसारखा मेकओव्हर करेल त्यांना हे बक्षीस मिळणार आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित आणि तृप्ती भोईर निर्मित ‘टुरिंग टॉकीज’ हा चित्रपट 19 एप्रिल रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

प्रेक्षकांनी गांभीर्याने घेतले तरच...
चित्रपटांतील कलाकारांना छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये कोंबून, रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पेशल एपिसोड चित्रित करून, छोटे-मोठे बॅनर छापून आजवर मराठी चित्रपटांचे प्रमोशन केले जात होते. मात्र, मराठी चित्रपटांची जाहिरात करण्याचे पारंपरिक मार्ग सोडून वेगळ्या वाटा शोधण्याचा ‘टुरिंग टॉकीज’ या चित्रपटाचा हा फंडा प्रेक्षक किती गांभीर्याने घेतात आणि चित्रपटाच्या बॉक्स आॅफिसवर त्याचा काय परिणाम होतो हे येत्या 19 एप्रिल रोजी कळेल.