आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हा आहे महाराष्‍ट्रातील स्‍वर्ग, प्रत्‍येकाने एकदा तरी भेट द्यावीच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळा लागला तशी सृष्‍टी हिरवा शालू पांघरून नटली. त्‍यामुळे अनेकांनी पावसाळी पर्यटनाचा बेत आखाला आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार प्रसिद्ध पर्यटनस्‍थळ लोणावळ्याविषयी खास माहिती...
थंड हवेसाठी प्रसिद्ध
> मुंबई-पुणे महामार्गावर समुद्र सपाटीपासून 625 मीटर उंचावर हे ठिकाण आहे.
> सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे.
> विपूल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्‍या, पावसाळ्यात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते.
> म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
खरी मज्‍जा पावसाळ्याच
> पावसाळ्याच्या दिवसांत लोणावळ्यामध्‍ये पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते.
> हिवाळ्यात तर धुके लपेटूनच फिरावे लागते.
काय आहे पाहण्‍यासारखे ?
> लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.
> राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर ही त्यापैकी काही ठळक ठिकाणे होत.
> हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत.
> लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, लोणावळ्याचे मनोवेधक फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)