आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Literature Festivel News In Marathi, Divya Marathi, Ghuman

मराठी साहित्य संमेलन : घुमानमध्ये मराठी वातावरणनिर्मिती करण्‍याचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुढील वर्षी एप्रिल महिन्यात पंजाबच्या घुमानमध्ये होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घुमानमध्ये आतापासूनच मराठी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न संयाेजक व साहित्य महामंडळाच्या वतीने होत आहे. पंजाबमध्ये मराठी साहित्यप्रेमी असतील का, या शंकेने धास्तावलेल्या महाराष्ट्रातील साहित्यिकांना व प्रकाशकांना दिलासा देण्यासाठी हे प्रयत्न सुरू असून नुकतेच येथे पंजाबी-मराठी कविसंमेलन आयोजित करण्यात आले.

लेखिका कविता महाजन, कवी रामदास फुटाणे, अशाेक नायगावकर, नलेश पाटील, अरुण म्हात्रे आदी मान्यवरांनी नुकताच घुमान येथे काव्यवाचनाचा कार्यक्रम सादर केला. त्यांच्यासमवेत पंजाबमधील प्रसदि्ध कवी जसवंत जफर यांसारखे मान्यवरदेखील सहभागी झाले होते. कवितांच्या माध्यमातून पंजाबी-मराठी साैहार्दाचा माहोल निर्माण करीत घुमानमध्ये मराठी संमेलन यशस्वी होणार काय? या शंकेला पूर्णविराम देण्याचा यानिमित्ताने साहित्य महामंडळ प्रयत्न करीत आहे. अशाच आणखी एका कार्यक्रमाचेही नियाेजन सध्या महामंडळ करीत असून हा कार्यक्रमदेखील घुमानमध्ये वातावरणनिर्मिती करण्यासाठी यशस्वी ठरेल, असा महामंडळाच्या पदाधिका-यांना विश्वास आहे. कार्यक्रमांना जसा चांगला प्रतिसाद मिळताे आहे तसाच

संमेलनालाही मिळेल, असाही या कवींना विश्वास आहे.
संमेलनाचे निमंत्रक संजय नहार यांची ‘सरहद’ संस्था सध्या काश्मीरमध्ये जलप्रलयाच्या पार्श्वभूमीवर काम करीत असल्याने नहार तिकडे व्यग्र आहेत. या कामाची संमेलनाला मदतच होईल, असे नहार यांनी सांगितले आहे.

डॉ. मोरे यांचा अर्ज दाखल
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यकक्षपदाच्या निवडणुकीसाठी डॉ. सदानंद मोरे यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. २३ सप्टेंबर ही नावे सुचवण्याची अंतिम मुदत आहे. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा या नात्याने मोरे यांचा अर्ज स्वीकारला.

डॉ. कामत यांचाही दावा
संत नामदेव यांच्या पंजाबमधील कार्याचा गेली ४५ वर्षे अभ्यास करणारे पुणे वदि्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे माजी प्रमुख डॉ. अशोक कामत यांनीसुद्धा ८८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीचा अर्ज भरला.आपली उमेदवारी जाहीर केली आहे.